शेतकऱ्यांचा मुख्य व्यवसाय म्हणून दूध वुवसायाकडे बघितले जाते. असे असताना मात्र अनेकदा दुधाच्या दरात चढउतार येतात. यामुळे अनेकदा अडचणीचा सामना करावा लागतो. तसेच तोट्यात धंदा करावा लागतो. मात्र उस्मानाबाद तालुक्यातील वाघोली येथील सतिष खडके यांनी यामध्ये करून दाखवले आहे. यामुळे सध्या त्यांची चर्चा रंगली आहे. त्यांनी होल्सटीन फ़्रिसियन जातीच्या गाईंचा संभाळून दुध व्यवसाय वाढवण्याचा निर्धार केला होता. सध्या त्यांनी हा प्रयोग यशस्वी करुन दाखवला आहे.
सध्या 6 गायींच्या माध्यमातून महिन्याला दीड लाखाचे उत्पन्न त्यांना मिळत आहे. जिद्द, चिकाटी आणि व्यवसयामध्ये सातत्य ठेवल्यामुळे त्यांनी हे यश मिळवले आहे. सतिष खडके सह त्यांचा मुलगा आनंद खडके हे पहाटे 4 ते सकाळी 7 वाजेपर्यंत व त्यानंतर दुपारी 3 ते सायंकाळी 6 वाजे पर्यंत गोठा स्वच्छ करणे गाईना आहार देणे नंतर मशिनद्वारे दुध काढणे हे काम करतात. जास्त वेळ न घालवता ते कमी वेळेत ही कामे करतात.
योग्य नियोजन आणि कामामध्ये सातत्य ठेवल्याने त्यांना शेणामधूनही अधिक फायदा मिळत आहे. गायीच्या शेणामुळे शेतजमिनीचा दर्जा सुधारत आहे. तर कधी विक्रीतून पैसे मिळत आहेत. सर्वांसाठी हा प्रयोग प्रेरणादायी ठरत आहे. चार वर्षांमध्ये गायींची संख्या दुप्पट झाली आहे तर उत्पन्नातही वाढ झाली असल्याचे खडके यांनी सांगितले आहे. योग्य वेळी सकस आहार आणि गायींची देखभाल या दोन महत्वाच्या गोष्टी असल्याचे त्यांनी सांगितले. मुरघास, सुपर निपिअर , ज्वारी कडबा , हरभरा भुसकट, सुगरास, पेंड, सरकी हे खाद्य दिले जाते.
त्यांना महिण्याला 50 हजार रुपये खर्च येतो. सध्या दूधाला 25 ते 28 रुपये लिटर असा दर मिळत आहे. शिवाय वाघोली गावातच दूध डेअरी असल्याने याच ठिकाणी दूध विक्री होत असल्याने त्यांचा वाहतूकीचा खर्चही टळलेला आहे. खडके यांना वर्षाला शेणखत व दूधापासुन किमान 7 ते 8 लाखाचा निव्वळ नफा मिळत आहे. यामुळे केवळ नोकरीच्या मागे न धावता असे व्यवसाय करून देखील चांगले उत्पन्न आपल्याला मिळू शकते.
2018 साली त्यांनी पंजाब लुधियाना हरियाण येथुन HF जातीच्या 6 गायी आणल्या, यासाठी त्यांना ६ लाख रुपये लागले. तसेच 2 लाख रुपये शेड असे एकुण 8 लाख रुपये खर्च त्यांना आला. सुरुवातीला त्यांना अनेक अडचणी आल्या, गायींची जोपासणा आणि होणारा खर्च याचा ताळमेळ लागत नव्हता पण त्यांनी चिकाटी सोडली नाही. चार वर्षानंतर मात्र आता ते यशस्वी झाले आहेत.
Share your comments