लम्पी आजार शेतकऱ्यांच्या चिंतेचा विषय ठरत आहे. नांदेड जिल्ह्यातील शेतकऱ्यांसाठी महत्वाची बातमी आहे. नांदेड (nanded) जिल्ह्यातील तब्बल 481 जनावरांना लम्पी आजाराची बाधा झाली आहे.
आतापर्यंत 27 जनावरे लम्पी स्कीनमुळे मृत्यूमुखी पडली आहेत. तसेच आज पर्यंत लम्पी स्कीन (Lumpy skin) नियंत्रणासाठी तीन लाख 96 हजार 550 जनवरांचे लसीकरण पूर्ण झाले आहे.
मासिक पाळी उशिरा का येते? जाणून घ्या नेमकं कारण...
माहितीनुसार नऊ पशुपालकांना (Cattle breeder) शासनाच्या निकषानुसार अर्थसाहाय्य देण्यात आले आहे. अशी माहिती जिल्हा पशुसंवर्धन उपआयुक्त डॉ. मधुसूदन रत्नपारखी यांनी दिली. विशेष म्हणजे सध्याच्या घडीला नांदेड जिल्ह्यातील 68 गावे बाधित आहेत. या 68 गावातील 31 हजार 755 जनावरांपैकी 481 बाधित पशुधनाला वेगळे काढून त्यांच्यावर उपचार केले जात आहेत.
धक्कादायक! गेल्या 9 महिन्यात 756 शेतकऱ्यांच्या आत्महत्या
लम्पीमुळे (Lumpy) आजपर्यंत २७ जनावरांचा मृत्यू झाला आहे. पशुपालकांनी घाबरून न जाता पशूची स्वच्छता, गोठ्यातील स्वच्छता व पशुवैद्यकीय अधिकारी यांनी सांगितल्याप्रमाणे काळजी घ्यावी असे आवाहन जिल्हा प्रशासनाने शेतकऱ्यांना केले आहे.
महत्वाच्या बातम्या
पोस्ट ऑफिसच्या ग्राम सुमंगल योजनेत 170 गुंतवा आणि मिळवा 19 लाख रुपयांचा परतावा
रब्बी हंगामासाठी 9 लाख टन खतांची मागणी; शेतकऱ्यांना होणार फायदा
महत्वाची बातमी! LIC आयडीबीआय बँकेतील आपला 60.72 टक्के हिस्सा विकणार
Share your comments