शेतकऱ्यांचा हक्काचा व्यवसाय म्हणजे दुग्ध व्यवसाय. शेतीमध्ये जरी नुकसान झाले तरी दुग्ध व्यवसायामध्ये शेतकऱ्यांना चांगले पैसे मिळतात. असे असताना दुग्ध व्यवसायामध्ये अनेकदा अगदी छोट्या छोट्या गोष्टींवर लक्ष दिले तर शेतकऱ्यांना अजूनच फायदा होतो. यामध्ये गाईला प्रसूतीसाठी एक महिना शिल्लक राहील तेव्हा त्या जनावराला 10 मि.ली. 25 दिवस दररोज Adder-H द्या म्हणजे त्याच्या शरीरात काही विकार असल्यास ते बरे होतील.
असे केल्याने पशूच्या शरीरात कुठलाच विकार नसेल तर ते पशु सदृढ बनेल आणि दुधाच्या उत्पादनात देखील वाढ होईल. यामुळे हे करणे गरजेचे आहे. जनावराच्या प्रसूतीसाठी सुमारे 15 दिवस शिल्लक राहिले की त्या जनावराला दररोज 100 ग्रॅम एनबूस्ट पावडर दिल्यास पुढील वेताला अधिक दूध देण्यास पुरेशी ऊर्जा त्या जनावराला मिळेल. तसेच त्याची ताकद देखील वाढेल.
तसेच जनावर प्रसूत झाल्याच्या 11 व्या दिवसापासून त्या जनावराला डिझामॅक्स फोर्टे बोलस 2 सकाळी, 2 संध्याकाळी आणि सिमलाज बोलस सकाळी एक संध्याकाळी एक या प्रमाणात 10 दिवस खायला दिल्याचा जनावराच्या दूध उत्पादन क्षमतेत वाढ होणार आहे. तसेच प्रसूत झाल्यानंतर एक महिन्यापासून दररोज 50 ग्रॅम बायोबिओन-गोल्ड पावडर खायला दिल्यास याचा देखील फायदा होणार आहे.
यामुळे जनावर वेळेवर गर्भधारणा धारण करेल. जर तुम्ही या पद्धतींचे योग्य व्यवस्थापन केल्यास म्हशी देखील तब्बल 20 ते 25 लिटर पर्यंत दूध देण्यास सक्षम बनतील आणि दरवर्षी सदर जनावर पारडूला जन्म देतील. गाई देखील जास्त प्रमाणावर दूध देतील. यामुळे शेतकऱ्यांना चार पैसे जास्तीचे मिळणार आहेत.
महत्वाच्या बातम्या;
एका गाईच्या खाद्यात १० शेळ्या जगतात, विदेशी शेळीपालन शेतकऱ्यांसाठी ठरतंय वरदान, वाचा सगळी माहिती
... म्हणून माझ्या प्रेमाला विरोध झाला, शेतकऱ्याने मुख्यमंत्र्यांना सांगितली व्यथा
सातारा जिल्ह्यात पावसाचा धुमाकूळ, अनेक ठिकाणी गारपीठ, वीज पडून महिलेचा मृत्यू
Share your comments