MFOI 2024 Road Show
  1. पशुधन

पोल्ट्री मालकांनो ! पावसाळ्यात कोंबड्यांना संसर्ग आजार होण्याची शक्यता

कुक्कुटपालन अनेक शेतकरी करत आहेत, या व्यवसायातून शेतकऱ्यांचे उत्पन्न दुप्पट होण्यास मदत मिळते. परंतु फक्त पोल्ट्री टाकून आपली जबाबदारी संपली असे होत नाही. चांगल्या नफ्यासाठी आणि उत्पन्नासाठी आपल्याला पक्ष्यांची काळजी घ्यावी लागते.

भरत भास्कर जाधव
भरत भास्कर जाधव


कुक्कुटपालन अनेक शेतकरी करत आहेत, या व्यवसायातून शेतकऱ्यांचे उत्पन्न दुप्पट होण्यास मदत मिळते. परंतु फक्त पोल्ट्री टाकून आपली जबाबदारी संपली असे होत नाही. चांगल्या नफ्यासाठी आणि उत्पन्नासाठी आपल्याला पक्ष्यांची काळजी घ्यावी लागते. उन्हाळ्यातही वेगळ्या प्रकारच्या उपाय योजना करुन कोंबड्यांना पोसावे लागते. आता सध्या पावसाळा चालू आहे,  यादिवसात ही आपल्याला दक्ष राहावे लागते. या दिवसात कोंबड्यांना संसर्गजन्य आजार लागणयाची शक्यता असते.  पावसात कोंबड्या ओल्या झाल्या तर त्यांना अनेक प्रकारचा आजार लागण्याची शक्यता असते. अशावेळी आपण कोंबड्यांच्या आहार- पाण्याकडे लक्ष दिले पाहिजे.  या दिवसात कोंबड्यांची काय काळजी घेतली पाहिजे याविषयी आम्ही आपणांस आज सांगत आहोत.

हीटर चा करा उपयोग  -

कुक्कुटपालन करताना आपल्याकडे हीटर असणे आवश्यक असते.

या दिवसात कोंबड्यांचे तापमान व्यवस्थित ठेवण्यासाठी हीटरचा उपयोग होत असतो. लहान पक्ष्यांना हीटरची उष्णता चांगली वाटते, कारण लहान असल्यामुळे ते त्यांच्या शरिरातील तापमान नियंत्रित करु शकत नाहीत. हीटरमुळे त्यांचे तापमान व्यवस्थित राहण्यास मदत होते.  यासह अंडे उत्पादनासाठीही हीटर फायदेकारक असते.

थंड वातावरणात कोंबड्यांना अधिक भूक लागत असते. अशावेळी आपल्याकडे आहाराची कमतरता पडत असते. आहार संतुलित ठेवण्यसाठी आणि आपल्याकडे असल्याला आहार साठा पुरेल यासाठी कोंबड्यांच्या खाद्यामध्ये तेल किंवा वसा मिसळावा. जेणेकरून खाद्य जास्त लागत नाही, यामुळे शेतकऱ्यांचा किंवा पोल्ट्री मालकाचा अधिक खर्च होत नाही.

 


 पावसळ्याच्या दिवसात कोंबड्यांच्या पिण्याचे पाण्याकडे लक्ष देणे गरजेचे आहे. जर पावसाचे पाणी त्यांच्या पिण्यात आले तर त्यांना आजार लागण्याची शक्यता असते. कारण पावसाचे स्वच्छ नसते. यामुळे  त्यांचे आरोग्य निरोगी राखण्यासाठी डी- वॉर्मर्स फायदेकारक असते.  कोंबड्यांचे सेड हे कोरडे ठेवणे आवश्यक असते. कोरडे स्थान राहिल्यास तेव्हा कोंबड्या निरोगी राहण्यास मदत होईल. 

लसीकरण  - पावसाळ्याच्या दिवसात कोंबड्यांची रोगप्रतिकारक शक्ती कमी होत असते. यामुळे बॅक्टेरिया आणि विषाणूमुळे कोंबड्या सहजपणे संक्रमित होत असतात. या वातवरणात डास आणि इतर रक्त पिणाऱ्या किड्यांमुळे कोंबड्यांना आजार जडत असतात, त्यामुळे लसीकरण वेळोवेळी करणे गरजेचे आहे. 

English Summary: During the rainy season, chickens get infected Published on: 01 July 2020, 03:03 IST

Share your comments

आमच्या न्यूसलेटरचे सदस्य व्हा. शेती संबंधीत देशभरातील आताच्या बातम्या मेलवर वाचण्यासाठी आमच्या न्यूसलेटरची सदस्यता घ्या.

Subscribe Newsletters