शेतीव्यतिरिक्त पशुपालन हा असा एक पर्याय आहे जो शेतकऱ्यांचे उत्पन्न वाढविण्यास मोठा हातभार लावतो.आतापर्यंत तुम्ही गाय,म्हैस,शेळी,मासे आणि कोंबड्या बद्दल आपल्याला माहिती आहे.
परंतु आपण शेळीपालनामध्ये अशाच एका महत्त्वपूर्ण शेळीच्या जातीची माहिती घेणार आहोत, तिचे नाव आहे दुंबा शेळी होय.
शेळीपालनामध्ये दुंबा शेळीला बाजारात चांगली मागणी असते व ती लवकर परिपक्व देखील होते. त्यामुळे दुंबा शेळीपालन हा पैसा मिळवण्याचा उत्तम पर्याय आहे. त्याबद्दल या लेखात माहिती घेऊ.
दुंबा एक शेळीची जात
दुंबा शेळीची एक जात आहे. या जातीच्या बोकड चे मागणी ईदच्या दिवशी खूप असते. त्याला किंमत देखील चांगली मिळते.
त्यामुळे शेळी पालन करणाऱ्या शेतकऱ्यांमध्ये ती लोकप्रिय आहे. या जातीचा नर देखील तेवढाच शेळी पालकांच्या पसंतीचा असूनया जातीच्या शेळी ची पिल्ले देखील मोठ्या प्रमाणात विकली जातात.
नक्की वाचा:Goat Information: दिवसाला पाच लिटर दूध देते 'ही'विदेशी शेळी,जाणून घेऊ सविस्तर माहिती
दुंबा शेळी चे वैशिष्ट्य
उत्तर प्रदेशातील अमरोहा जिल्ह्यातील शेतकरी अनेक वर्षांपासून दुंबा पालन करत आहेत.या माध्यमातून अनेक शेतकरी दरवर्षी लाखो रुपयांची कमाई करतात.
येथील शेतकऱ्यांच्या मध्ये एक वर्षाच्या कोकराचे वजन सुमारे शंभर किलो होते असे शेतकरी सांगतात. दुंबा नऊ महिने ते एक वर्षाच्या कालावधीत पिल्ले जन्माला घालते.
सुरुवातीच्या दोन महिन्यात पिल्लांचे वजन 25 किलो होते. या जातीची पिल्ले दिसायला खूप आकर्षक दिसतात व त्यांना चांगली किंमत मिळते.
दुंबा जातीच्या शेळीच्या पिल्लांची किंमत
या जातीच्या शेळ्यांच्या पिल्लांची किंमत दोन महिन्यात तीस हजार रुपयांवर जाते मात्र तीन ते चार महिने होतात त्यांची किंमत 70 ते 75 हजार रुपयांपर्यंत जाते.
या जातीच्या शेळी ची किंमत ही नर किंवा मादी या दराने मिळत नसून तिच्या वैशिष्ट्यांवर मिळते. परंतु मादी दूंबाला चांगली किंमत मिळते.
नक्की वाचा:जमुनापरी शेळी' देईल शेळीपालनात बंपर नफा, घ्या 'या' गोष्टींची काळजी
Share your comments