
dunmba sheep
शेती ही जगात मानवाच्या निर्मिती पासुन केली जात आहे, आधी परंपरागत पद्धत्तीने केली जात होती, पण आता बदलत्या काळानुसार आणि तंत्रज्ञानाचा वापरामुळे शेती ही आधुनिक पद्धत्तीने केली जात आहे. शेतीसोबतच पशुपालन, विशेषता शेळीपालन तसेच मेंढीपालन मानव फार पूर्वीपासून करत आला आहे. आणि गेल्या दोन तीन शतकपासून ह्यात नावीन्यपूर्ण बदल घडून येत आहे. आणि शेतकरी राजा शेतीसमवेत मेंढीपालन हा पूरक व्यवसाय करून लाखों रुपयांची कमाई करत आहे.
मित्रांनो आज आम्ही आपणांस अशाच मेंढीपालन विषयी माहिती सांगणार आहोत. मेंढीपालनात सर्वात महत्वाची गोष्ट म्हणजे मेंढीची जात, मेंढीची जात चांगली असली की उत्पन्नात खात्रीने भर पडते. आज आपण मेंढीची एक स्पेशल जात म्हणजे दुम्बा विषयी जाणुन घेणार आहोत. जर दुम्बा पालन चांगल्या शास्त्रीय पद्धत्तीने केले तर ह्यातून शेतकरी बांधव चांगली कमाई करू शकता.
'दुम्बापालन' विषयी अल्पशी माहिती
शेतकरी मित्रांनो दुम्बा ही एक मेंढीची जात आहे. दुम्बा ही जात इतर मेंढीच्या आकारासारखीच असते परंतु दुम्बाची शेपटी ही खुप जाड आणि वजनदार असते. खरं बघायला गेले तर दुम्बा ही मेंढी तुर्की देशाची आहे आणि तिथूनच ह्या मेंढीला खरी प्रसिद्धी मिळाली. दुम्बा ही मेंढी तुर्कीसतांनातच भल्या मोठ्या प्रमाणात आढळते, पण आता जगात इतर ठिकाणी दुम्बा पालन चांगल्या मोठ्या प्रमाणात होत आहे. मुस्लिम बांधवांच्या ईदच्या वेळी ह्या दुम्बाची कुर्बानी पण दिली जाते म्हणुन ह्याची मागणी ही लक्षणीय आहे. ह्या जातीच्या मेंढीचे वजन अधिक असल्याने ह्याची मागणी ही चांगली असते.
कसं करणार दुम्बा पालनला सुरवात
प्रत्येक व्यवसाय हा छोट्या स्तरापासून ते मोठया स्तरापर्यंत करता येतो असंच काहीस तुम्ही दुम्बा पालन सोबत पण आहे. तुम्ही तुमच्या बजेटनुसार दुम्बा पालन सुरू करू शकता. आपण किमान एका दुंबाच्या छोट्या कळपापासून देखील सुरूवात करू शकता. ज्यात चार मादी दुम्बा आणि एक नर दुम्बा असायला हवा. यासाठी तुम्ही मोठे दुम्बा खरेदी करू शकता किंवा लहान कोकरू खरेदी करू शकता. पण जर तुम्ही मोठे दुम्बा मेंढया खरेदी केल्या तर तुम्हाला त्यांच्या वजनानुसार पैसे मोजावे लागतील. पण जर कोकरू विकत घेतली तर ती स्वस्त दरात उपलब्ध होतील. 9 ते 10 महिन्यांच्या दुम्बाच्या कोकरूचे वजन खूप जास्त असते. म्हणून तीन महिन्यांच्या कोकरूना खरेदी करणे फायदेशीर ठरू शकते. जर तुम्ही तीन महिन्यांचे कोकरू पालणासाठी घेतले तर ते 9 ते 10 महिन्यांत व्यात येण्यास तयार होते. दीड वर्षात तुम्हाला त्या दुम्बा पासून अजून चार कोकरे मिळतील. व्यवसाय सुरू करण्यासाठी पहिली दोन वर्षे पिल्लाना विकू नका. त्यानंतर तुम्ही ते कोकरू विकू शकता.
दुम्बा मेंढीची बाजारातील किंमत
दुम्बाचे सर्वात मोठे वैशिष्ट्य म्हणजे ह्याला उपलब्ध असलेला बाजार. दुम्बाला विक्रीसाठी खुप मोठा बाजार उपलब्ध आहे त्यामुळे ह्यांचे पालन फायदेशीर ठरत असल्याचे सांगितलं जात. दुम्बा खरेदी करण्यासाठी खरेदीदार स्वतः तुमच्याकडे येतील आणि दुम्बा खरेदी करतील आणि ते घेऊन जातील. याशिवाय, ईदच्या सणाच्या वेळी तुम्ही दुम्बा तयार करू शकता. त्याला सर्वत्र चांगली मागणी असते. दुम्बाच्या कोकरूंची सरासरी किंमत 25000 रुपये पर्यंत असते. दुम्बाचे कोकरू एका वर्षात 70 ते 80 किलो पर्यंत वजनदार होते. ते सुमारे 70 ते 80 हजार रुपय एवढे महाग विकले जाते. अशा तर्हेने जर 100 दुम्बाचे पालन केले तर वार्षिक उत्पन्न हे जवळपास 20-30 लाख रुपये पर्यंत मिळू शकते. ह्यात बाजार मूल्य नुसार कमी जास्त होऊ शकते
Share your comments