1. पशुधन

बदक पालन शेतकऱ्यांसाठी ठरणार वरदान! पण ‘या’ गोष्टी नेहमी ठेवा ध्यानात

फार पूर्वीपासून शेतकरी बांधव अतिरिक्त उत्पन्न प्राप्त करण्यासाठी शेती सोबत पशुपालन करत आहेत. पशुपालन (Animal Husbandry) हा शेतीसाठी एक उत्तम जोडव्यवसाय (Business) आहे, देशात पशुपालक शेतकरी कुक्कुटपालन, मत्स्य पालन, शेळीपालन, गाई-म्हैस पालन, वराह पालन इत्यादी प्रकारचे पशुपालन करून चांगली मोठी कमाई करत असतात. या सर्व्यापैकी हटके पशुपालन अर्थात आज आपण बदक पालन (Duck rearing) याविषयी जाणून घेऊया. मित्रांनो आम्ही आपणास सांगू इच्छितो की, देशात बदकाच्या अंड्याला आणि मांसाला मोठी मागणी वाढली आहे.

अजय वसंत शिंदे
अजय वसंत शिंदे
duck rearing

duck rearing

फार पूर्वीपासून शेतकरी बांधव अतिरिक्त उत्पन्न प्राप्त करण्यासाठी शेती सोबत पशुपालन करत आहेत. पशुपालन (Animal Husbandry) हा शेतीसाठी एक उत्तम जोडव्यवसाय (Business) आहे, देशात पशुपालक शेतकरी कुक्कुटपालन, मत्स्य पालन, शेळीपालन, गाई-म्हैस पालन, वराह पालन इत्यादी प्रकारचे पशुपालन करून चांगली मोठी कमाई करत असतात. या सर्व्यापैकी हटके पशुपालन अर्थात आज आपण बदक पालन (Duck rearing) याविषयी जाणून घेऊया. मित्रांनो आम्ही आपणास सांगू इच्छितो की, देशात बदकाच्या अंड्याला आणि मांसाला मोठी मागणी वाढली आहे.

त्यामुळे बदक पालन शेतकऱ्यांसाठी (For farmers) एक वरदान सिद्ध होऊ शकते. अनेक व्यक्ती प्रोटीन च्या पूर्ततेसाठी आपल्या आहारात बदकच्या आणि कोंबडीच्या अंड्यांचा समावेश करतात. देशात कुकूटपालन (Poultry farming) मोठ्या प्रमाणात होत असल्याने कोंबडीचे अंडे सहजरीत्या लोकांना उपलब्ध होऊन जाते, मात्र बदक पालन अद्याप देशात मोठ्या प्रमाणात होत नसल्याने लोकांना बदकाची अंडी सहजरीत्या उपलब्ध होत नाहीत. बदकाच्या अंड्यात कोंबडीच्या अंड्यापेक्षा अधिक प्रोटीन आढळत असल्याचा दावा केला जातो. त्यामुळे दिवसेंदिवस बदकाच्या अंडयाना मोठी मागणी बघायला मिळत आहे. त्यामुळे बदक पालन शेतकऱ्यांसाठी फायद्याची ठ्जारू शकते आणि यातून चांगली मोठी कमाई शेतकरी करतील. मित्रांनो मात्र आपणास व्यवसायिकरीत्या (Professionally) बदक पालन करायचे असेल तर काही गोष्टींची विशेष काळजी घ्यावी लागेल. पण जर आपणास फक्त घरासाठी बदक पालन सुरु करायचे असेल तर आपणास जास्त मेहनत घ्यावी लागणार नाही. देशातील एकूण कुकूटपालनापैकी जवळपास दहा टक्के पालन बदकांचे होते, परंतु दिवसेंदिवस बदकांच्या मांसात आणि अंड्यात वाढ होत असल्याने, एवढेसे बदक पालन मागणी पूर्ण करण्यास अक्षम आहे. त्यामुळे बदक पालन व्यवसायात मोठा स्कोप असल्याचे जाणकार सांगत आहेत. चला तर मग मित्रांनो जाणून घेऊया बदक पालनाविषयी.

बदक पालणातील काही महत्वपूर्ण बाबी (Some important aspects of duck rearing)

  • पशुपालक शेतकरी मित्रांनो जर आपणासही बदक पालन करायचे असेल, तर बदकाच्या सुधारित जातीचे (Improved breed of duck) पालन करावे असा सल्ला दिला जातो. जर आपण बदकाच्या सुधारित जातीचे पालन केले तर आपणास एका बदका पासून वर्षाकाठी सुमारे 300 अंड्यांचे उत्पादन मिळू शकते. 
  • पशुपालक शेतकरी मित्रांनो आपण इंडियन रनर, पांढरा आणि ग्रेनीश, खाकी कॅम्पबेल या बदकाच्या सुधारित जातीचे पालन करू शकता. असे असले तरी खाकी कॅम्पबेल या जातीचे पालन फायदेशीर असल्याचे वैज्ञानिक (Scientist) सांगत असतात. या बदकाचे पालन करून वर्षाकाठी 300 अंड्यांचे उत्पादन सहजरीत्या मिळते.
  • बदक पालनात विशेष काळजी ही बदकाच्या पिल्लांचीच घ्यावी लागते विशेषता तेव्हा, जेव्हा तापमानात मोठ्या प्रमाणात घट घडून येते. थंडीत बदकाच्या पिल्लांना पत्र्याच्या शेडमध्ये ठेवण्याची शिफारस केली जाते. बदकाच्या खुराड्यात (In the cage) यासाठी 200 वॉटचा बल्प जमिनीपासून दोन फूट उंचीवर लावण्याची शिफारस केली जाते.
  • जेव्हा बदक अंडी फोडतात तेव्हा अंड्यातून निघणारी नवजात पिल्ले (Newborn Ducks) डायरेक्ट जमिनीवर न ठेवता चटईवर ठेवण्याची शिफारस केली जाते. आणि जवळपास सहा आठवडे तीन दिवसाआड चटई ही उन्हात वाळवावी लागते.
  • बदकांच्या पिलांसाठी आहार (Feeding for ducklings) देताना देखील विशेष काळजी घ्यावी लागते, तुम्ही पिल्लांना तांदळाचे छोटे छोटे दाने पाण्यात भिजवून खायला देऊ शकता.
  • जेव्हा बदकांची पिल्ले पूर्ण महिन्याभराची होतात तेव्हाच त्यांना पाण्यात सोडावे, मात्र शिकारी पक्ष्यापासून तसेच पशुपासून पिल्लांचे रक्षण करणे गरजेचे असते.
  • बदक पालनातून अंड्याचे चांगले उत्पादन (Good egg production) घेण्यासाठी ज्या पाण्यात बदकाचे संगोपन केले जाणार आहे ते पाणीचांगले स्वच्छ असावे.
  • तसेच प्रत्येकी दहा मादी बदकामागे (the female duck) एक नर बदक असणे अनिवार्य आहे.
  • पशुपालक मित्रांना आम्ही आपणास सांगू इच्छितो की, सुमारे सहा महिन्यानंतर बदक अंडी घालायला सुरुवात करतात.
English Summary: duck rearing is helping farmers try this farming and make more money Published on: 06 March 2022, 05:55 IST

Like this article?

Hey! I am अजय वसंत शिंदे. Did you liked this article and have suggestions to improve this article? Mail me your suggestions and feedback.

Share your comments

आमच्या न्यूसलेटरचे सदस्य व्हा. शेती संबंधीत देशभरातील आताच्या बातम्या मेलवर वाचण्यासाठी आमच्या न्यूसलेटरची सदस्यता घ्या.

Subscribe Newsletters