1. पशुधन

कसे कराल बदक पालन आणि काय आहेत फायदे, जाणून घ्या सर्व काही

बारमाही अगर वाहत्या पाण्यात मत्स्यपालन आणि बदकपालन ही संकल्पना अगर प्रयोग माझ्या मते करून पाहायला पाहिजे. यशस्वी झाला तर दोन फायदेशीर व्यवसाय एकाच ठिकाणी अतिशय कमी मॅनेजमेंटमध्ये करता येऊ शकतील. सध्या बदकपालन समुद्र किनारपट्टीलगत भातशेतीत केलं जाते. बदके पाळण्यासाठी कायमस्वरूपी पाणीसाठा असावा लागतो.

KJ Maharashtra
KJ Maharashtra
बदक पालनाचे फायदे

बदक पालनाचे फायदे

बारमाही अगर वाहत्या पाण्यात मत्स्यपालन आणि बदकपालन ही संकल्पना अगर प्रयोग माझ्या मते करून पाहायला पाहिजे. यशस्वी झाला तर दोन फायदेशीर व्यवसाय एकाच ठिकाणी अतिशय कमी मॅनेजमेंटमध्ये करता येऊ शकतील. सध्या बदकपालन समुद्र किनारपट्टीलगत भातशेतीत केलं जाते. बदके पाळण्यासाठी कायमस्वरूपी पाणीसाठा असावा लागतो. लहान तळी, मोठी तळी, शेततळी, गावतळी, धरणं इ. ठिकाणी बदक पालन करता येऊ शकतं.

बदकाचं मुख्य खाद्य म्हणजे भात शेतीतल्या गोगलगाई, तसेच अनेक प्रकारच्या किडी, पाण वनस्पती, शेवाळ, पाण्यातील किडे, जीवजंतू, गांडुळे, कृमी, हिरव्या वनस्पती इ. बदके ज्वारी बाजरीचे दाणे, कडधान्यांचे दाणेही खातात. बदकाची जी वैशिष्ट्ये आहेत अगर त्यांची जी जीवनप्रणाली आहे, ती व्यवसायाच्या दृष्टीने फायद्याचीच आहे. दक्षिणेत बदक व्यवसाय हा मेंढपाळीसारखा आहे.

बदकाची वैशिष्ट्ये

  • एका गावातून दुसऱ्या गावात जिथे जाण्याची उपलब्धता असते तिथे जातात.

  • रात्रीच्यावेळी बदके शेतात एका ठिकाणी ठेवतात आणि सकाळी अंडी गोळा करतात.

  • शिवाय रात्रभर शेतात बसवल्याबद्दल (मूत्र खत यांच्या मोबदल्यात) शेतकऱ्यांकडून पैसेही घेतात.

  • बदकं कोंबड्यांपेक्षा जास्त काटक असतात.

  • कोंबड्यांपेक्षा वाढही जलद होते.

  • अंडी मोठी असून ते देण्याचे प्रमाणही जास्त असते.

  • खाद्यावरचा खर्च कोंबडीच्या तुलनेत निम्माच असतो.

  • बदकाच्या घर व्यवस्थापनासाठी जास्त खर्च येत नाही.

  • कोंबडीच्या तुलनेत बदकांची फारशी काळजी घ्यावी लागत नाही.

  • बदके रात्रीच्यावेळी अंडी देतात.शक्यतो १००% बदके रात्री ते सकाळी ९ वाजेपर्यंत अंडी घालतात आणि त्यानंतर त्यांना चरायला सोडता येतं.

 

बदक पालनाचे फायदे

  • बदकामध्ये रोगप्रतिकार शक्ती जास्त असते, त्यामुळे रोगराईचं प्रमाण कमी असतं.

  • बदक कळपात राहत असल्याने त्यांची संरक्षण मॅनेजमेंट सोयीची असते.

  • १००% बदके रात्री ते सकाळी ९ पर्यंत अंडी घालतात. त्यामुळे सर्वच्या सर्व अंडी पदरात पडतात.

  • बदके चरायला सोडल्यानंतर स्वतःचे अन्न स्वतः शोधतात. चरणे झाल्यानंतर रात्री मूळ जागेवर येण्याची त्यांना तंतोतंतपणे सवय लावता येते.

  • दलदलीच्या रेताड पाणथळ जागेवर बदकपालन करता येते. देखभालीवराचा खर्च कमी.

  • अंडी मोठी असून पौष्टिक असतात. (फक्त आपल्याला बदक अंडी खाण्याची हॅबिट लावून घेणं जरुरीचं आहे.)

  • बदकांच्या मांस उत्पादनासाठी मस्कोव्ही, पेंकिंग या जाती आहेत.

  • बदकांच्या अंडी उत्पादनासाठी ऑरपिंगटन, खाकी कॅम्पेबल, इंडियन रनर, म्यॉग पाईन व्हाईट स्टॅनब्रिज या जाती असून खाकी कॅम्पेबल आणि इंडियन इंडियन रनर या दोन जाती आपल्याकडे जास्त प्रमाणात पाळतात.

  • त्या वर्षाकाठी ३०० अंडी देतात, इतर जाती वर्षाकाठी १७५ ते २५० अंडी देतात. शोभेची बदके शोभिवंत, देखणी असून सोनेरी, लाल, जांभळी, निळी, काळी, पांढरी. पिवळी इ. छटायुक्त असतात. टील विडजन, पिनटेन, करोलिना शोव्हेलियर या जाती शोभिवंत बदकाच्या आहेत. बदक

  • प्रजोत्पादनासाठी १० महिन्यांनी तयार होते. ५-६ महिन्यांनी झाली म्हणजे अंडी देतात. एक नर ४ -५ माद्यांसाठी ठेवावा.

 

 

बदकांना मुबलक पाणी असावेच लागते. ६’ × ६’ × १.५’ च्या टाक्यात १० बदके पाळता येतात. पाण्याच्या उपलब्धते जवळच बांबू, तुराट्या, तट्ट्याच्या साह्याने घर करता येतं. प्रत्येक बदकास २ चौ. फुट जागा पुरेशी होते. घराभोवती कंपाउंड करून मोकळी सोडवीत. कोंबड्यांच्या खाद्याप्रमाणे प्रथिनयुक्त उर्जायतुक्त राजे १२० ते १५० ग्रॅम खाद्य द्यावं. ७ आठवड्यांत ८ किलो खाद्य खाऊन २.५ किलो वजनाची बदके होतात. कोंबडीच्या पिलांप्रमाणे पिल्लांची जोपासना करावी.

सुरुवातीला ३० सें. ग्रॅ. तापमान ठेवावे नंतर दर आठवड्याला ३.४ सें. ग्रॅ. नी तापमान कमी करीत जावे सुरुवातीला प्रथिने आणि उर्जा मिळवण्यासाठी खाद्य द्यावं. ते वय वाढीनुसार वाढवावे.चौथ्या आठवड्यांपासून पिल्लांना मोकळं सोडावं. पाणी सतत पाहिजेत नाही तर डोळ्यांचे विकार होतात.

लेखक - प्रविन सरवदे, कराड
प्रतिनिधी गोपाल उगले

English Summary: Duck rearing, how to do rearing and what are the benefits, know everything Published on: 22 July 2021, 11:10 IST

Share your comments

आमच्या न्यूसलेटरचे सदस्य व्हा. शेती संबंधीत देशभरातील आताच्या बातम्या मेलवर वाचण्यासाठी आमच्या न्यूसलेटरची सदस्यता घ्या.

Subscribe Newsletters