बदक पालनातून आपल्याला रोजगार असतो आपल्याला चांगला पैसा मिळत असतो. व्यवसायात कुकुटपालन पेक्षा कमी धोका असतो.बदकाच्या मांसआणि अंड्यामध्ये अधिक रोगप्रतिकारक शक्ती असते. कोंबड्या पेक्षा बदकांच्या मांस मध्ये रोग प्रतिकारशक्ती जास्त असते.
शिवाय बदकाचे मांस आणि अंडी प्रथिने समृद्ध असतात. मग अधिक नफा आणि अधिक प्रोटीन साठी बदक पालन व्यवसाय करायलाच हवा. यासाठी आपणास बदक पालन विषयी माहिती घेऊ.
बदक पालनाची सुरुवात अशी करा
बदक पालन करण्यासाठी आपल्याला चांगली शांत जागा निवडावी लागते. यासाठी जर तलावा शेजारी जागा मिळाली तर अतिउत्तम. पण जर बदल करण्याच्या ठिकाणी काही जलाशय नसला तर काही हरकत नाही कारण आपण कृत्रिम पद्धतीचा तलाव किंवा तळे बनवू शकतो.
जर तलाव किंवा तळे खोदण्यासाठी पुरेसा पैसा आपल्याकडे नसला तर आपण आपल्या शेतातील टीन शेड मध्ये चहूबाजूने दोन ते तीन फूट खोल आणि रुंद तळे बनवू शकतात. एका बदकाला पाळण्यासाठी दीड वर्ग फूट जमिनीची आवश्यकता असते.
बदकांचा आहार
बदकांना प्रोटीन असलेले अन्न अधिक द्यावे.बदकाच्या पिल्लांना 22 टक्के या प्रमाणात प्रोटीन देणे आवश्यक असते. कोंबड्या पेक्षा याचा खर्च एक ते दोन टक्क्यांनी कमी असतो.
उपचार आणि काळजी
बदकं मधील आजारांविषयी जर आपण माहिती घेतली तर बदका डकफ्लू चा अधिक त्रास होत असतो.त्यामुळे त्यांना हा आजार होऊ नये यासाठी संरक्षण देणे आवश्यक असते.जर बदकांना जास्त ताप आला तर बदक मृत पावत असतात. त्यानंतर त्यांना डक फ्लूचे लसीकरण करावे.नियमितपणे शेडची सफाई करावी.दोन दोन महिन्यांनी शेडमध्ये कीटकनाशकांचा वापर करून ते स्वच्छ करावे.
Share your comments