जगात शेती क्षेत्राच्या प्रारंभीपासून पशुपालन मोठ्याप्रमाणात केले जात आहे. आपल्या देशातही अनेक शेतकरी बांधव शेतीला जोड व्यवसाय म्हणून पशुपालन करत असतात. आज आपण बदक पालन शेतकरी बांधवांना कशा पद्धतीने फायदा देऊ शकते याविषयी जाणून घेणार आहोत. बदक पालन कुकुटपालन यापेक्षा अधिक फायद्याचे असते. बदक पालन हे इतर पशुपालनाच्या तुलनेत सोपे असल्याचे सांगितले जाते. कुक्कुटपालनाच्या तुलनेत बदक पालनासाठी कमी खर्च करावा लागत असल्याचे सांगितले जाते, त्यामुळे यापासून कुक्कुटपालनाच्या तुलनेत अधिक नफा प्राप्त केला जाऊ शकतो.
बदक पालन सुरु करण्यासाठी आपणास अतिरिक्त जागेची आवश्यकता नसते त्यामुळे यासाठी खर्च हा जवळपास नगण्य असतो. आपण बदक पालन कुठूनही सुरू करू शकता यासाठी विशेष अशा कुठल्याच जागेची आवश्यकता नसते. शेतकरी मित्रांनो जर आपणास बदक पालन प्रायोगिक तत्त्वावर सुरु करायचे असेल तर आपण केवळ 30 ते 40 बदकांपासून बदक पालन व्यवसाय सुरू करू शकता. प्रायोगिक तत्त्वावर सुरू केलेल्या व्यवसायात जर आपणास चांगला ला प्राप्त झाला तर आपण बदकांची संख्या वाढवू शकता. सुरुवातीला छोट्या स्तरावर जर आपण व्यवसाय सुरू केला तर आपणास कुठल्याच मजुरांची आवश्यकता भासणार नाही.
कृषी वैज्ञानिकांच्या मते, इतर पशुपालन करण्यापेक्षा बदक पालन करणे अधिक फायद्याचे असते. यासाठी कमी इन्व्हेस्टमेंटची गरज लागत असल्याने अल्पभूधारक शेतकऱ्यांसाठी हा व्यवसाय विशेष लाभप्रद सिद्ध होऊ शकतो. कुकूटपालन पेक्षा या व्यवसायातून दुप्पट नफा मिळत असल्याचे सांगितले जाते. कोंबडीचे अंडे हे 60 ते 65 ग्रामच्या दरम्यान असतात तर बदकाचे अंडे हे 65 ते 75 ग्रॅम वजनाचे असतात. कोंबडी एका वर्षात 230 अंडी देण्यास सक्षम असते तर बदक मात्र 320 अंडी देण्यास सक्षम असते. तसेच बदकच्या अंड्यात अधिक मात्रा मध्ये प्रोटीन उपलब्ध असल्याने याची मागणी देखील अधिक असते.
बदक पालन व्यवसाय सुरू करण्यासाठी आपणास बदकाचे पिल्ले खरेदी करावी लागतात आपण बदकाचे पिल्ले बदक पालन करणाऱ्या व्यावसायिकांकडून खरेदी करू शकता. बदक पालन व्यवसाय सुरू करण्यासाठी आपणास मात्र पन्नास हजार रुपये खर्च अपेक्षित असतो, जर आपण आपला व्यवसाय थोड्या मोठ्या स्तरावर करू इच्छित असाल तर आपणास सुमारे दोन लाख रुपये पर्यंत खर्च येऊ शकतो.
जर आपण पाचशे बदक खरेदी करून हा व्यवसाय सुरू करू इच्छित असाल तर आपणास महिन्याला पंधरा हजार रुपये खर्च अपेक्षित असतो. आपण हा व्यवसाय सुरू केल्यानंतर मासिक 50 ते 60 हजार रुपये कमवू शकतात.
Share your comments