काळाच्या ओघात शेतीमध्ये बदल करणे महत्त्वाचे आहे. शेतीमध्ये पीकपद्धतीत बदल करणे तसेच केवळ शेतीवर अवलंबून न राहता शेती पूरक व्यवसायाची (Agricultural Complementary Business) सांगड घालणे देखील आता बदलत्या काळानुसार महत्त्वाचे ठरत आहे.
शेती पूरक व्यवसायमध्ये पशुपालन (Animal Husbandry) एक महत्त्वाचा आणि अतिशय फायद्याचा व्यवसाय ठरत आहे. पशुपालनासाठी शेतकरी बांधवांना (Farmers) अधिक पैसा खर्च करावा लागत नाही शिवाय यातून चांगले उत्पन्न मिळत असल्याने आता अनेक शेतकरी बांधव पशुपालन व्यवसायाकडे वळू लागले आहेत. मित्रांनो जर आपणही शेतीसोबतच शेती पूरक व्यवसाय करण्याच्या विचारात असाल तर आपल्यासाठी बदक पालन (Duck Farming) वरदान सिद्ध होऊ शकते. आज आपण बदक पालन या व्यवसायाविषयी थोडीशी माहिती जाणून घेणार आहोत.
हेही वाचा:-Milk Production: गायी- म्हशीपासून अधिक प्रमाणात दूध कसं मिळवणार, जाणून घ्या सर्व माहिती
आम्ही तुम्हाला सांगू इच्छितो की, बदकपालन हा एक फायदेशीर शेती पूरक व्यवसाय (side business) आहे. हा व्यवसाय कुक्कुटपालनापेक्षा अधिक किफायतशीर व्यवसाय ठरू शकतो. या व्यवसायाचे सर्वात मोठे वैशिष्ट्य म्हणजे यासाठी अधिक पैसा खर्च करावा लागत नाही शिवाय पशुधनाला देखील रोगाचा धोका कमी असतो. विशेष म्हणजेच ऋतुमानानुसार बदक स्वत:ला हवामानानुसार जुळवून घेतात.
बदक पालन भारतात पश्चिम बंगाल, आसाम, ओडिशा, केरळ, आंध्र प्रदेश इत्यादी राज्यांमध्ये जास्त प्रमाणात केले जाते. असे असले तरी महाराष्ट्रातही अनेक शेतकरी बांधव बदक पालन करण्यासाठी हळूहळू का होईना सरसावले आहेत.
हेही वाचा:-गायी, म्हशींतील प्रजनन व त्याचे असे करा व्यवस्थापन
बदकासाठी आवश्यक खुराक - बदकांचे संगोपन करण्यासाठी अधिक पैसा खर्च करावा लागत नाही कारण की यांना खूपच कमी प्रमाणात आहार द्यावा लागतो. पाण्यात राहणारे कीटक, लहान मासे, बेडूक इत्यादींचा वापर त्यांच्या अन्नासाठी करता येऊ शकतो.
बदक एका वेळी किती अंडी घालते?- बदक एका वेळी सुमारे 40 - 50 अंडी घालते. दुसरीकडे, वजनाचा विचार केल्यास, प्रति अंड्याचे वजन सुमारे 15 ते 20 ग्रॅम असते. याशिवाय बदकांची अंडी देण्याची वेळ सकाळची असते. अंड्याचे कवच खूप जाड असते, त्यामुळे तुटण्याची भीती नसते.
हेही वाचा:-आता जनावरांच्या खरेदी-विक्रीसाठी मोबाइल अँपची निर्मिती, आता घरबसल्या करा व्यवहार
बदक पालन व्यवसायातील काही महत्त्वाच्या बाबी -
- मित्रांनो जर आपणास बदकांचे संगोपन करायचे असेल तर यासाठी जास्त जागेची आवश्यकता भासत नाही. आपण कोणत्याही तलावात बदक पालन सुरु करू शकता. यासाठी विशेष असा तलाव बांधावा लागत नाही. तुम्ही तुमच्या जवळच्या तलावातही बदकांचे संगोपन करु शकता.
- जेव्हा बदके वयस्क बनतात आणि अंडी घालू लागतात तेव्हा त्यांच्यासाठी बॉक्सची व्यवस्था मात्र करावी लागते. एका पेटीत तीन बदके ठेवता येतात. या शिवाय या व्यवसायातील सर्वात मोठी बाब म्हणजे बदक पालन करण्यासाठी आवश्यक जागा अतिशय स्वच्छ व नीटनेटकी असावी.
- बदकांची अंडी ठेवण्यासाठी एक लहान बॉक्स 12x12x18 आकाराचा आपणास मात्र तयार करावा लागणार आहे.
- जिथे बदकांची अंडी ठेवली जाणार आहेत तिथे लाईटची उत्तम व्यवस्था असणे आवश्यक राहणार आहे.
- याशिवाय बदक ठेवायच्या पेटीभोवती नळ्या लावा किंवा आपण इतर मार्गांनी बदकांना पिण्यासाठी पाण्याची व्यवस्था करू शकता. बदकांना मात्र नेहमी स्वच्छ पिण्याचे पाणी द्यावे
हेही वाचा:-मानमोडी आजार आहे कोंबड्यांमधील सर्वात घातक; प्रतिबंधात्मक उपाय ठरतील यावर परिणामकारक
Share your comments