1. पशुधन

दुधाचे अधिक उत्पादन हवे? ; लागवड करा ‘या’ चारा पिकांची, होणार उत्पन्नामध्ये भराभराट

येत्या खरीप हंगामामध्ये जर तुम्ही जनावरांसाठी चारा पिकाचे नियोजन करत असाल. तर ज्यामधून तुमच्या जनावरांसाठी पोषक तत्वे मिळतील अशा पिकांचे किंवा चाऱ्याची लागवड करून घ्या. दुधाळ जनावरांसाठी आहार फार महत्त्वाचा असतो. अधिक दूध उत्पादनासाठी जनावरांना योग्य खाद्य देणे आवश्यक असते.

KJ Maharashtra
KJ Maharashtra


येत्या खरीप हंगामामध्ये जर तुम्ही जनावरांसाठी चारा पिकाचे नियोजन करत असाल.  तर  ज्यामधून तुमच्या जनावरांसाठी पोषक तत्वे मिळतील अशा पिकांचे किंवा चाऱ्याची लागवड करून घ्या. दुधाळ जनावरांसाठी आहार फार महत्त्वाचा असतो. अधिक दूध उत्पादनासाठी जनावरांना योग्य खाद्य देणे आवश्यक असते. खाण्यास स्वादिष्ठ, दुध उत्पन्नामध्ये वाढ, जनावरांच्या  आरोग्यासाठी सकस असेल, अशा चारा पिकांसाठी शेतकरी आग्रही असतात. पण  बऱ्याच भागांमध्ये पाण्याची उपलब्धता मुबलक प्रमाणात नसते अशा परिस्थिती मध्ये चारा पिकांची लागवड करणे थोडे अवघड असते, त्यामुळेच कमी पाण्यावर येणारे चारा पीक घेणे गरजेचे असते.

त्यासाठी आज आपण पारंपारिक चारा पिकांना पर्यायी पिकांचा मागोवा घेणार आहोत, जी कसदार असतील व शेतकऱ्यांना फायदा मिळवून देतील. या  प्रकारातील चारा दुधाळ जनावरांना दिल्यास दूध उत्पन्नात वाढ होते. हिरवा चारा असल्याने हा चार किती द्यावा याची कोणतीच मात्रा नसते. पण दिवसातून आपण दोन – तीनदा हा चारा गुरांना देऊ शकतो.  

शुगर ग्रेझ- कडवळ प्रकारातले हे चारा पीक सध्या शेतकऱ्यांमध्ये खूप आवडीच होत आहे, कारण या पिकातून प्रथिने, तंतुमय पदार्थ, चाऱ्यांमध्ये असलेलं साखरेच उत्तम प्रमाण आहे.  या पिकाची उंची १५ फुटापर्यंत होते, पाणी वापराची कार्यक्षमता इतर पिकांपेक्षा चांगली आहे. आणि मुरघास याचा खूप पौष्टिक होत असल्यामुळे शेतकऱ्यांचा प्रतिसाद प्रचंड आहे.  या पिकाची लागवड तशी कोणत्याही जमिनीत  केली जाऊ शकते. पण शक्यतो  क्षारपड जमीन टाळावी.

 


यासाठी मातीचा सामू ५.५ -७.५ पर्यंत चालून जातो. सुगर ग्रेझची लागवड खरीप, रब्बी व उन्हाळी हंगामात केली जाते.  चांगल्या उत्पन्नासाठी सरी वरंबा पद्धत किंवा पेरणी करून वाफे काढून घ्यावेत. भारी जमिनीत ६ किलो तर हलक्या जमिनीत ५ किलो बियाणे प्रती हेक्टर गरजेचे आहे,  यामध्ये दोन साऱ्या मधील सरासरी अंतर २५ सेंमी तर दोन रोपांमधील अंतर १० सेंमी ठेवावे. पेरणी आधी २ मिली क्लोरपायरिफॉस व २ ग्राम कार्बेन्डाझिम प्रती लिटरच्या हिशोबाने बीज प्रक्रिया करून घ्यावी, जेणेकरून खोडकिड व इतर रोगांना पीक सुरूवातीच्या काळात बळी पडणार नाही.  खताचे नियोजन महत्वाचे आहे, त्यासाठी १०-१५ टन शेणखत पूर्व माशागतीच्या वेळी घालून घ्यावे. लागवडी नंतर ३०:१५:१० किलो नत्र:स्पुरद:पालाश प्रती हेक्टरी प्रत्येक कापणी नंतर आवर्जून घालावे. सुगर ग्रेझची पहिली काढणी पेरणीनंतर ४५-५० दिवसांनी येते. दुसरी काढणी ७०-९० दिवसांनी काढू शकता. सरासरी या पिकापासून ८९६ क्विंटल हिरव्या चारच उत्पन्न मिळते.

 


मक्खन ग्रास-
उच्च पोषक तत्वाने भरपूर पिकव खाण्यास स्वादिष्ट असलेल्या चाऱ्याची एक पेक्षा ज्यास्त कापण्या घेता येतात. या पिकाची लागवड खरिप हंगामाध्ये करता येते, कारण याला थंड वातावरणाची गरज भासते. सर्व मातीतल्या प्रकारत याची लागवड करू शकता, त्याचबरोबर ६.५-७ सामू असलेली जमीन उत्तम असते. यासाठी ६-७ किलो बियाण्याची गरज भासते व ३० सेंमी ओळींमध्ये अंतर ठेवावे. १५-२० टन कुजलेले शेणखत तसेच ३०:२०:३० किलो नत्र:स्पुरद:पालाश प्रती हेक्टरी प्रत्येक कापणी नंतर आवर्जून घालावे. मक्खन ग्रासची पहिली काढणी पेरणीनंतर ५०-६० दिवसांनी येते. त्यानंतरच्या कापणीसाठी सरासरी २५-३० दिवसाचा कालावधी लागतो.

लसूण घास- लसूण घास महारष्ट्रामधील बऱ्याच भागामध्ये चारा पीक म्हणून घेतलं जात आहे. या पिकाला  शेतकऱ्यांकडून खूप चांगला प्रतिसाद मिळत आहे,  कारण या चाऱ्यामध्ये १९-२२ % प्रथिने असतात.  तसेच स्वादिष्ठपणामुळे जनावर आवडीने खातात. यासाठी मध्यम ते भारी व चांगली निचरा होणाऱ्या मातीची गरज आस्ते. रब्बी हंगामध्ये याची पेरणी करावी लागते.  व २५ किलो बियाणे प्रती हेक्टरी लागते. बीजप्रक्रियेसाठी रायझोबियम जीवाणू २५० ग्राम प्रती १० किलो बियाण्याला चोळावे. १० टन शेणखत तसेच १५:१५०:४० किलो नत्र:स्पुरद:पालाश प्रती हेक्टरी लागवडी दरम्यान द्यावे.  व प्रत्येक चार महिन्या नंतर १५:५० किलो नत्र व स्पुरद प्रती हेक्टरी द्यावे. पहिली कापणी ५०-५५ दिवसांनी व नंतरची २५-३० दिवसांनी करता येते.

English Summary: Do you want to increase milk production? Then cultivate new improved forage crop Published on: 20 May 2020, 08:06 IST

Share your comments

आमच्या न्यूसलेटरचे सदस्य व्हा. शेती संबंधीत देशभरातील आताच्या बातम्या मेलवर वाचण्यासाठी आमच्या न्यूसलेटरची सदस्यता घ्या.

Subscribe Newsletters