1. पशुधन

डेअरीच्या व्यवसायासाठी उपयुक्त आहेत विदेशी गायी ; दिवसाला देतात २५ लिटर दूध

शेती व्यवसायासह जोडव्यवसाय म्हणून पशुपालनाचा आणि दुधाचा व्यवसाय केला जातो. दुधाचा व्यवसायात शेतकऱ्यांना अधिक नफा मिळत असतो आणि त्यातून शेतकरी आपले उत्पन्न दुप्पट करत असतात. सध्या देशात दुधाची मागणी दिवसेंदिवस वाढत आहे.

भरत भास्कर जाधव
भरत भास्कर जाधव


शेती व्यवसायासह जोडव्यवसाय म्हणून पशुपालनाचा आणि दुधाचा व्यवसाय केला जातो. दुधाचा व्यवसायात शेतकऱ्यांना अधिक नफा मिळत असतो आणि त्यातून शेतकरी आपले उत्पन्न दुप्पट करत असतात.  सध्या देशात दुधाची मागणी दिवसेंदिवस वाढत आहे.  देशातील एकूण वार्षिक उत्पन्नात २० ते ३० टक्क्यांनी वाढ झालेली आहे.  यात  जर गायीचे दूध असले तर त्याला अधिक मागणी असते. यासाठी जर तुम्ही डेअरी सुरू करण्याचा विचार करत असाल तर म्हैशींसह गायीही पाळाव्यात.

आज आम्ही तुम्हाला अशाच दोन गायींची माहिती देणार आहोत ज्या आपल्या डेअरीसाठी फार फायदेशीर ठरतील.  या गायींमध्ये अधिक दूध देण्याची क्षमता आहे.  जर आपण या जातीच्या गायी पाळल्या तर आपल्या उत्पन्नात नक्कीच भर पडले. गायींच्या अनेक जाती आहेत, पण यात विदेशी जातीच्या गायी तुम्ही जर पाळल्या तर दूध उत्पन्नात वाढ होईल.  विशेष म्हणजे या जाती भारतात देखील लोकप्रिय आहेत.

होल्सटीन फ्रिसियन म्हणजे एचएफ गाय (Holstein friesian cow)

सर्वाधिक दूध देणारी गाय म्हणून जगात या गायीची ओळख आहे. या गायींचा शरीर मोठं असतं.  या गायी काळ्या किंवा सफेद रंगाच्या असतात.  या गायीचे वजन हे ५८० किलोग्राम असते.  या गायी अधिक दूध देतात. परंतु या गायी जास्त तापमान सहन करु शकत नाहीत.  पण या गायी दूध देण्यात माहिर असून दररोज २५ ते ३० लिटर दूध देत असतात मात्र त्यांच्या दुधातील फॅट कमी असते.  ३.५ टक्केच फॅट त्याच्या दुधात असते.  दिवसाला ३० लिटर दूध देणाऱ्या या गायी ४० ते ६० हजार रुपयात मिळतात.

 


(Jersey cow)जर्सी गायी  - या गायी मुळात इंग्लंडमध्ये आढळतात. या गायी मध्यम आकाराच्या असतात. याचा रंग लाल, कपाळ रुंद आणि डोळे मोठी असतात. याचे वजन ४०० ते ४५० किलोग्राम असते. या गायी दिवसाला १२ ते १४ लिटर दूध देत असतात. या गायीं कोणत्या वातावरणात राहतात. म्हणजे भारतातील वातावरणात या गायी सहज राहत असतात. या गायींची विशेषता म्हणजे या गायींची रोगप्रतिकारक क्षमता ही चांगली असते. एचएफ गायींच्या तुलनेत या गायी अधिकचे तापमान सहन करू शकतात.

English Summary: do you want start dairy business ? these two breed cow gives 25 to 30 liter milk daily Published on: 04 June 2020, 03:11 IST

Share your comments

आमच्या न्यूसलेटरचे सदस्य व्हा. शेती संबंधीत देशभरातील आताच्या बातम्या मेलवर वाचण्यासाठी आमच्या न्यूसलेटरची सदस्यता घ्या.

Subscribe Newsletters