1. पशुधन

जनावरांना पावसाळ्यात होतात हे खतरनाक आजार, वेळीच लक्ष न दिल्याने होते नुकसान

मागील काही दिवसांपासून महाराष्ट्रात अतिवृष्टी झाली आहे. अतिवृष्टीमुळे वातावरणातील ओलावा, चारा आणि पाण्याची ढासळलेलीप्रतया एकूणच परिस्थिती मुळे जनावरांच्या शरीर प्रक्रियेवर ताण पडतो.जनावरांमध्ये आजाराचे प्रमाण किंवा साथीचे रोग जसे घटसर्प, फऱ्याइत्यादी आजार उद्भवतात.या आजारांची वेळीच योग्य काळजी घेणे फार आवश्यक आहे.पावसाळ्यात जनावरांमध्ये होणाऱ्या आजारांविषयी या लेखात माहिती घेऊ.

पाटील रत्नाकर अशोक
पाटील रत्नाकर अशोक
cow

cow

मागील काही दिवसांपासून महाराष्ट्रात अतिवृष्टी झाली आहे. अतिवृष्टीमुळे वातावरणातील ओलावा,  चारा आणि पाण्याची ढासळलेलीप्रतया एकूणच परिस्थिती मुळे जनावरांच्या शरीर प्रक्रियेवर ताण पडतो.जनावरांमध्ये आजाराचे प्रमाण किंवा साथीचे रोग जसे घटसर्प, फऱ्याइत्यादी आजार उद्भवतात.या आजारांची वेळीच योग्य काळजी घेणे फार आवश्यक आहे.पावसाळ्यात जनावरांमध्ये होणाऱ्या आजारांविषयी या लेखात माहिती घेऊ.

 

 पावसाळ्यात जनावरांना होणारे आजार व त्यावरील उपचार

  • फऱ्या-या रोगाचे लक्षणे म्हणजेजनावरांना एकाकी ताप येतो. मागचा पाय लंगडतो.मांसल भागाला सूज येते. सुजन दाबल्यास चरचर आवाज येतो. या रोगावर उत्तम उपाय म्हणजे दरवर्षी सुरुवातीला जनावरांना लसीकरण करून घ्यावे.
  • घटसर्प-या रोगात जनावराचे एकाएकी आजारी पडते.जनावरांचे खाणे पिणे बंद होते.अंगात प्रचंड ताप भरतोव गळ्याला सूज येते.डोळे खोल जातात.घशाची घरघर सुरू होते.या रोगावर प्रतिबंधात्मक उपाय म्हणजे दरवर्षी पावसाळ्यापूर्वी जनावरांना ऑइल अड्जव्हेंटएच. एस.तेलयुक्त लस टोचून घ्यावी
  • कासदाह-या रोगामध्ये सडाला तसेच कासेला सूज येते. दूध अति पातळ, रक्तमिश्रित व पु मिश्रित येते.जनावर कासेला हात लावू देत नाही. दूध काढण्यापूर्वी कास जंतुनाशकने कास धुवावी. अधून-मधून कासदाह रोगासाठी दुधाची तपासणी करून घ्यावी. गाय किंवा म्हशी आटवण्याच्या शेवटच्या दिवशी सडात अँटिबायोटिक्स ट्यूब सोडाव्यात.
  • थायलेरियॉसिस- या रोगात जनावरांना सतत एक-दोन आठवडे ताप येतो. जनावरे खंगत जातात. जनावरे अंबावन खात नाही. घट्ट हगवण होते. वेळेवर उपचार न झाल्यास मृत्यू होतो. या रोगास प्रतिबंधक उपाय म्हणजे गोचीड, माशा वगैरेमुळे या रोगाचा प्रसार जास्त होतो.त्यामुळे गोठा स्वच्छ ठेवणे गरजेचे आहे.जनावरांच्या अंगावर देखील गोचीड प्रतिबंधक पावडर लावावी.
  • तिवा- या रोगामध्ये जनावरास सडकून ताप येतो.जनावरांचे खाणे मंदावते.जनावरे थरथर कापते. एका पायाने लंगडते. मान, पाठ, डोळे व पायाचे स्नायू अंकुचन पावतात.तिवा रोगाचा प्रतिबंध करण्यासाठी डासांचे निर्मूलन करावे.
  • पोटफुगी- या आजारात जनावराची डावी कुसफुगते.जनावर बेचैन होतेतसेच खाणे व रवंथ करणे बंद करते. जनावर सारखे ऊठ-बस करते.टिचकी ने आवाज केल्यास टमटम आवाज येतो. या रोगास प्रतिबंधक उपाय म्हणजे पावसाळ्यात ओला व कोरडा चारा अति प्रमाणात देऊ नये.
  • लिव्हरफ्लूक-या रोगात जनावराचे खाणे कमी होते.शेण पातळ होते. जनावराच्या खालचा जबडा खाली सूज येते. जनावर खंगत जाते व दगावते. या रोगास प्रतिबंधक उपाय म्हणजे सर्व जनावरांना दोन वेळा पावसाळ्यापूर्वी व नंतर जंताचे औषध पाजावे.पिण्यास नेहमी स्वच्छ पाणी द्यावे.
English Summary: disease to animal in rainy season take precaution and do management Published on: 11 October 2021, 12:35 IST

Like this article?

Hey! I am पाटील रत्नाकर अशोक. Did you liked this article and have suggestions to improve this article? Mail me your suggestions and feedback.

Share your comments

आमच्या न्यूसलेटरचे सदस्य व्हा. शेती संबंधीत देशभरातील आताच्या बातम्या मेलवर वाचण्यासाठी आमच्या न्यूसलेटरची सदस्यता घ्या.

Subscribe Newsletters