दूध उत्पादनात म्हशींना अनन्य साधारण महत्व आहे. म्हशीचे दूध हे इतर दुधापेक्षा आरोग्यदायी मानले जाते त्यामुळे त्याला मागणी जास्त आहे. या लेखात आपण म्हशीच्या च्या दोन प्रसिद्ध प्रजाती त्यांच्याबद्दल तुलनात्मक माहिती घेणार आहोत.
मुरा जातीची म्हैस
या जातीच्या म्हशी ची मागणी जास्त आहे.कारण या जातीची म्हैस दुध उत्पादनात अव्वल मानले जाते.यामुळे या जातीच्या म्हशी चा उपयोग जास्त करून जास्तीत जास्त दूध उत्पादनासाठी केला जातो. या जातीच्या म्हशीच्या दुधामध्ये फॅटची मात्रा सात ते आठ टक्के असते. म्हशीची ही प्रजात जास्त करून पंजाब, हरियाणा राज्यात जास्त आहे.
मुऱ्हा जातीच्या म्हशी चे वैशिष्ट्य
- या जातीची म्हैस शरीरयष्टी ने भक्कम असते. एच एस शिंगे आकाराने छोटे आणि मागे वळलेली असतात. रंग काळा असतो आणि शेपटी लांब असते.
- मुरा जातीची म्हैस इतर जातींपेक्षा दोन ते तीन टक्के जास्त दूध देते प्रति दिवस 15 ते 20 लिटरपर्यंत दूध सहजतेने देते.
- मुरा जातीची म्हैस थंड अथवा उष्ण तापमान असलेल्या ठिकाणी सुद्धा चांगल्या प्रकारे टिकाऊ धरते.
- या जातीच्या म्हशी ची किंमत 60 ते 80 हजार पर्यंत आहे.
2- म्हशीची उपयुक्त भदावरी जात
- या जातीच्या म्हशीच्या दुधामध्ये जास्तीचे तूप उत्पादना एक विशेष गुण असतो तसेच या जातीच्या म्हशी ची शारीरिक रचना फार वेगळी असते.
- या आकाराने मध्यम असते व शरीरावर हलके आणि छोटे केस असतात. तसेच तिचे पाय लहान असतात. परंतु फार मजबूत असतात.
- भदावरी जातीच्या म्हशी चे वजन 300 ते 400 किलोपर्यंत असते. या जातीच्या म्हशीचा शिंगाचा आकार तलवारीसारखा असतो.
- या जातीच्या म्हशीच्या आहारावर फार कमी खर्च होतो. अन्य म्हशींच्या तुलनेत या म्हशी चा आहार फार कमी असतो.
- या जातीची म्हैस प्रति दिवस चार ते पाच लिटर दूध देण्यात येते.
- या जातीची म्हैस अति उष्णता आणि वातावरणात जास्त आद्रता असलेल्या तापमानात देखील चांगला टिकाव धरते.या जातीच्या पारड्यांचा मृत्युदर इतर जातीच्या म्हशीच्यापारड्यापेक्षा फार कमी असतो.
- या जातीची म्हैस चीकिंमत 70 ते 80 हजार रुपयांपर्यंत आहे.
Share your comments