पावसाळ्यामध्ये जनावरे आजारी पडण्याचे व त्यामुळे होणाऱ्या मरतुकीचे प्रमाण सर्वाधिक असते.जनावरांना रोगाचा प्रादुर्भाव झाल्यावर उपचार करण्यापेक्षाया रोगाचा प्रादुर्भाव होऊ नये म्हणून अधिक काळजी घेणे फायद्याचे असते
अतिवृष्टी मुळे बऱ्याचदा वातावरणात ओलावा असतो, सूर्यप्रकाशाचा अभाव तसेच ढगाळ वातावरण, गोठ्यातील ओलावा, चारा-पाण्याची ढासळलेली प्रतएकूणच परिस्थिती मुळे बरेच आजार जनावरांना होतात. या लेखात आपण जनावरांच्या काही प्रमुख आजारांची माहिती, त्यांचे लक्षणे आणि उपाय जाणून घेणार आहोत.
जनावरांना होणारे प्रमुख आजार
- घटसर्प-या आजारामध्ये जनावर एकाएकी आजारी पडते.त्याचे खाणे पिणे बंद होते. अंगात फणफणून ताप भरतो.गळ्याला सूज येऊन डोळे खोल जातातव घशाचे घरघर सुरू होते.या रोगासाठी प्रतिबंधात्मक उपाय म्हणजे दरवर्षी पावसाळ्यापूर्वी निरोगी जनावरांना ऑइल अडज्युव्हटएच. एस. तेलयुक्त लस टोचून घ्यावी.
- कासदाह- या रोगामध्ये सडाला तसेच कासेला सूज येते. दूध हे अति पातळ, रक्त आणि पू मिश्रित,जनावर कासेला हात लावू देत नाही. यावर सर्वोत्तम उपाय म्हणजे दूध काढण्यापूर्वी जंतुनाशकाने कास धुवावी.अधून मधून कासदाह रोगासाठी दुधाची तपासणी करून घ्यावी. गाय किंवा म्हशी आटविण्याच्या शेवटच्या दिवशी सडात अँटिबायोटिक्स ट्यूब सोडाव्यात.
- थायलेरीयॉसिस- या रोगामध्ये जनावरांना सतत एकहे दोन आठवड्यांपर्यंत ताप येतो. जनावर खंगत जाते. व्यवस्थित खुराक खाता नाही.हगवन घट्ट होते.इलाज न झाल्यास मृत्यू होतो.या रोगात प्रतिबंधक उपाय म्हणजे गोचीड,माशा वगैरेमुळे या रोगाचा प्रसार जास्त होतो.म्हणून गोठे स्वच्छ ठेवावे. जनावरांच्या अंगावरही गोचीड प्रतिबंधक पावडर लावावी.
- तिवा-या रोगामध्ये जनावरास सडकून ताप येतो.जनावरांचे खाणे मंदावते.जनावरे थरथर कापते तसेच एका पायाने लंगडते. मान, पाठ,डोळे व पायाचे स्नायू आकुंचन पावतात.तिवा रोगाचा प्रतिबंध करण्यासाठी डासांचे निर्मूलन करावे.
- पोटफुगी- यामध्ये जनावराचे डावी कुस फुगते.जनावर बेचैन होते.जनावराचे खाणे व रवंथ करणे बंद होते.जनावर सारखी उठबस करते.या रोगात प्रतिबंधक उपाय म्हणजे पावसाळ्यात ओला व कोरडा चाराजनावरांना अति प्रमाणात खायला देऊ नये.
- हगवन- या प्रकारात जनावरास एकसारखे साधे अगर रक्तव सेना मिश्रित पातळ दुर्गंधीयुक्त शौचास होते.जनावर मलुलहोते. अशुद्ध व घाणेरड्या चाऱ्यामुळे हा आजार उद्भवतो.आजार टाळण्यासाठी जनावरांना शुद्ध पाणी व चांगले खाद्य द्यावे.
- लिव्हर फ्युक- या आजारांमध्ये जनावरांचे खाणे कमी होते व शेण पातळ होते.जनावराच्या खालचा जबडा खाली सूज येते.जनावरे खंगत जातात व दगावतात.या रोगात प्रतिबंधात्मक उपाय म्हणजे सर्व जनावरांना दोन वेळाम्हणजे पावसाळ्यापूर्वी व नंतर जंताचे औषध पाजावे.पिण्यास नेहमी स्वच्छ पाणी द्यावे.
( टीप-कुठल्याही आजारावर उपचार करण्या अगोदर पशुवैद्यकाचा सल्ला आवश्य घ्यावा.)
Share your comments