भारतात फार पूर्वीपासून शेतीसमवेत पशुपालन करून शेतकरी आपला जीवनाचा उदरनिर्वाह भागवत आहे. ज्या प्रमाणे शेतकरीसाठी शेती करणे महत्वाचे आहे त्याप्रमाणेच पशुपालन करणाऱ्या शेतकऱ्यांसाठी पशुपालन करणे महत्वाचे असते. पशुपालनात गाईचे पालन करणे खुप फायद्याचे ठरते. गाईला सनातन हिंदू धर्मात मातेचे स्थान दिले जाते आणि गाईमध्ये 33 कोटी देव सामाविष्ट असतात असे वैदिक धर्मग्रंथात नमूद केले आहे.
ह्यामुळे हिंदू धर्मात गाईच्या पूजनाला महत्व दिले गेले आहे. आज अशाच पवित्र गाईच्या पालणाबद्दल आपण जाणुन घेणार आहोत आणि गाईचे पालन करून आपण अतिरिक्त उत्पन्नाचे साधन उत्पन्न करू शकता शिवाय, गाईची सेवा करून ईश्वरसेवा देखील करू शकता. गाईच्या पालनात सर्वात महत्वाची गोष्ट म्हणजे गाईची जात; आज आपण आपल्या शेतकरी मित्रांसाठी गाईच्या अशाच एका जातीविषयी सांगणार आहोत आणि ती जात आहे डांगी. चला तर मग जाणुन घेऊया डांगी जातीच्या गाईच्या पालणाबद्दल सविस्तर…
डांगी गाईच्या जातीविषयी अल्पशी माहिती…
आजच्या ह्या आधुनिक युगाच्या जीवनात पशुपालनात अनेक नवीन जाती पालणासाठी उपलब्ध आहेत. तसेच गायींच्या पालनासाठीदेखील अनेक नवीन जाती आल्या आहेत, ज्यामुळे पशुपालन करणाऱ्या भूमिहीन व अल्पभूधारक शेतकऱ्यांना खूप फायदा झाला आहे.
गायीची अशी एक जात आहे डांगी, जी प्रामुख्याने गुजरातच्या डांग भागात आढळते, डांगी ही जात गुजरात प्रमाणे महाराष्ट्रातील नाशिक आणि अहमदनगर जिल्ह्यात आणि पश्चिम घाटामध्ये देखील आढळते. गुजरातच्या डांग भागावरूनच ह्या जातींचे नाव डांगी पडले असावे असे सांगितले जाते. या जातीच्या गायीचा रंग पांढरा भडक असतो. ह्या जातीच्या गाईच्या शरीरावर लाल किंवा काळे डाग असतात, तर शरीर मध्यम आकाराचे असते. ह्या जातीच्या गाईचे डोके लहान असते आणि मानेची कवळी लटकलेली दिसते. कान लहान असतात आणि खांद्याचा आकार मध्यम असतो. याशिवाय शिंगे लहान आणि जाड असतात. ह्या जातीच्या गाईंचा खुरांचा रंग काळा असतो, जे लहान आणि कडक असतात. ह्या जातीच्या गाईंची त्वचा ही चमकते, जणु तेल लावल्यासारखे तेलकट असल्याचे भासते जे शरीराला जास्त पाऊसापासून वाचवते.
डांगी गाईच्या विशेषता नेमक्या कोणत्या बरं…
गायीची ही स्थानिक प्रजाती विशेषतः त्याच्या कार्यक्षमतेसाठी ओळखली जाते, कारण ती अतिवृष्टी होणाऱ्या भागात आणि डोंगराळ भागातही वाढू शकते. विचारशीलता हे या जातीचे वैशिष्ट्य आहे. ह्या जातींचे पालन पूर्वी कांदाडी, महादेव, कोळी, ठाकूर आणि मराठा जाती करायचे असे सांगितले जाते.
या जाती पूर्वी वर्षातून सुमारे 9 महिने (जानेवारी ते सप्टेंबर) त्यांच्या गावाबाहेर फिरायचे आणि एका ठिकाणाहून दुसऱ्या ठिकाणी स्थलांतर करत राहायचे. त्यामुळे डांगी गाय ही स्थलांतर करण्यासाठी उत्तम असते आणि हवामानानुसार ती स्वतामध्ये बदल करण्यास सक्षम असते. गरम आणि कोरड्या हवामानात, ही जात वाढू शकते. किनारपट्टीच्या भागात ह्या जातींचे पालन केले जाऊ शकते. मुसळधार पाऊस आणि हिवाळ्यात ह्या जातींना डोंगराळ भागातील पायथ्याशी राहायला आवडते.
डांगी गाईला आहार कसा असावा…..
कडधान्य - मका, बार्ली, ज्वारी, बाजरी, चणे, गहू, ओट्स, कोंडा, तांदूळ, कॉर्न भुसी, कोरडे धान्य, भुईमूग, मोहरी इ.
हिरवा चारा - बर्सीम, ल्युसर्न, चवळी, गवारचा पाला, ज्वारी, बाजरी, हत्ती गवत, नेपियर बाजरी, सुदान गवत इ.
सुका चारा - बेरसीमचे कोरडे गवत, वेसणाचे कोरडे गवत, ओट्सचे कोरडे गवत, खडे, कॉर्न फ्लेक्स, ज्वारी आणि बाजरी, उसाचे पाचट, दूर्वाचे कोरडे गवत, मक्याचा सुका कडबा इ.
डांगी गाईची दुध उत्पादन क्षमता...
या जातीची दुग्ध उत्पादन क्षमता 1200 ते 1250 किलो प्रति व्यात असते. ह्या जातीच्या गाई 100 ते 400 दिवस दुध उत्पादन देण्यास सक्षम आहे. दुधातील चरबी सुमारे 4.3 टक्के असते.
Share your comments