1. पशुधन

'हा' चारा पशुची दुध उत्पादन क्षमता वाढवतो जाणुन घ्या ह्याविषयीं

जगात पशुपालन मोठ्या संख्येने केले जाते. पशुपालन हे विशेषता दुधासाठी केले जाते. भारतात देखील मोठया प्रमाणात पशुपालन केले जाते आणि मोठया प्रमाणात दुध उत्पादन केले जाते आणि पशुपालक शेतकरी ह्यातून चांगली कमाई करत आहेत

अजय वसंत शिंदे
अजय वसंत शिंदे
dashrath ghaas

dashrath ghaas

 जगात पशुपालन मोठ्या संख्येने केले जाते. पशुपालन हे विशेषता दुधासाठी केले जाते. भारतात देखील मोठया प्रमाणात पशुपालन केले जाते आणि मोठया प्रमाणात दुध उत्पादन केले जाते आणि पशुपालक शेतकरी ह्यातून चांगली कमाई करत आहेत

जाते आणि मोठया प्रमाणात दुध उत्पादन केले जाते आणि पशुपालक शेतकरी ह्यातून चांगली कमाई करत आहेत. पशुपालनात सर्व्यात महत्वाची गोष्ट म्हणजे पशुची निगा ठेवणे त्याच्या आहारची काळजी घेणे. पशुमध्ये दुध उत्पादन क्षमता वाढवण्यासाठी चांगला पोषक आहार पशुला देणे महत्वाचे आहे. भरपूर प्रमाणात प्रोटीन असलेला आहार पशुला दिला तर पशुमध्ये दुध उत्पादन क्षमता वाढते. पशु जास्त दुध उत्पादीत करतील तर पशुपालक शेतकऱ्यांचा फायदा होईल त्यांना अतिरिक्त उत्पन्न प्राप्त होईल. ह्या सर्व्या गोष्टींचा विचार करून आज आम्ही आपणांस अशाच एका चाऱ्याविषयीं माहिती सांगणार आहोत. चला तर मग जाणुन घेऊया ह्या चाऱ्याविषयीं.

 कृषी जागरण च्या शेतकरी वाचक मित्रांनो, आम्ही दशरथ घास विषयी बोलत आहोत. दशरथ घास पशुची दुध उत्पादन क्षमता वाढवते शिवाय पशु ह्यामुळे चांगले स्वस्थ राहतात. दशरथ घासचे वैज्ञानिक नाव डेसमेन्थस असे आहे. दशरथ घासमध्ये दुध वाढीसाठी आवश्यक प्रोटीन भरपुर प्रमाणात आढळते.

 दशरथ घास पशुच्या स्वास्थ्यसाठी एक महत्वपूर्ण आहार असल्याचे सांगितले जाते. दशरथ घास हे दुभत्या गाई, म्हशी, शेळ्या इत्यादींसाठी अत्यंत पौष्टिक मानले जाते. दशरथ घास पशूला खायला दिल्यास पशु काळ दूध देऊ शकते त्यामुळे शेतकऱ्यांचा फायदा होऊ शकतो. दशरथ घसाची लागवड हि दुष्काळी भागात देखील केली जाते त्यामुळे ह्याची लागवड हि कमी पावसाच्या क्षेत्रातील लोकांसाठी लाभदायी ठरेलं. दशरथ घासच्या लागवडीपासून दरवर्षी 30 ते 50 टन प्रति हेक्टर उत्पादन मिळते.

 दशरथ घासची विशेषता

पशुची दुध उत्पादन क्षमता वाढवण्यासाठी प्रोटीन ची आवश्यकता असते जे की दशरथ घास मध्ये मुबलक प्रमाणात आहे. 

त्यासोबतच दुध उत्पादन क्षमता वाढवण्यासाठी पशुला कॅल्शियम आणि फॉस्फरसची आवश्यकता असते ते देखील दशरथ घासमध्ये मुबलक प्रमाणात आहे त्यामुळे दशरथ घास हा पशुसाठी फायदेशीर आहे. त्यामुळे पशुपालक शेतकऱ्यांच्या उत्पन्नात भर पडेल. आम्‍ही तुम्‍हाला सांगू इच्छितो की, पशुपालनच्या क्षेत्रात जनावरांचे दुग्‍ध उत्‍पादन वाढवण्‍यासाठी इतर देशांतून अनेक प्रकारच्या चारा पिकांच्या प्रजाती भारतात आणण्‍यात आल्या आहेत, त्यापैकीच एक आहे दशरथ गवत. दशरथ घास हे मूळचे थायलंडचे पण हा विदेशी चारा आपल्या पशुसाठी वरदान सिद्ध होत आहे.

English Summary: dashrath ghaas is most useful for the milk growth Published on: 30 October 2021, 03:08 IST

Like this article?

Hey! I am अजय वसंत शिंदे. Did you liked this article and have suggestions to improve this article? Mail me your suggestions and feedback.

Share your comments

आमच्या न्यूसलेटरचे सदस्य व्हा. शेती संबंधीत देशभरातील आताच्या बातम्या मेलवर वाचण्यासाठी आमच्या न्यूसलेटरची सदस्यता घ्या.

Subscribe Newsletters