भारतामध्ये पशुपालन हा व्यवसाय मोठ्या प्रमाणावर चालतो. शेतीला मुख्य जोडधंदा म्हणून पशुपालनकडे पाहिले जाते. पशुपालन व्यवसाय मध्ये चाऱ्याचे व्यवस्थापन फारच आवश्यक असते. जेवढा चारा पोस्टीक तेवढे पशुंची कार्यक्षमता वाढते. या लेखात आपण चवळी, मारवेल आणि स्टायलो या चारा पिकांची लागवड तंत्रज्ञान शुद्ध पद्धतीने कशी करावी याबद्दल माहिती घेणार आहोत.
- मारवेल गवत:
1-मारवेल हे डोंगरी गवताप्रमाणे दिसते,परंतु डोंगरी गवतपेक्षा याची पाने मोठी व रसाळ असतात. हे गवत गायरान, चराऊ कुरणे व शेताच्या बांध्यावर लावण्यासाठी योग्य आहे.
2-या गवताची लागवड खरिपात करावी लागते.
3- लागवडीआधी दोन डोळ्यांच्या हेक्टरी 20 ते 22 हजार कांड्या लागतात.
4- 20 ते 25 दिवसांच्या अंतराने कापण्या घेतल्यास हेक्टरी वर्षभरात 80 ते 85 टन वैरण मिळू शकते.
- स्टायलो गवत:
- हे द्विदल वर्गातील बहुवार्षिक चारा पीक असून यामध्ये 15 ते 16 टक्के प्रथिने असतात.
- स्टायलो या गवताची लागवड जून-जुलै महिन्यात करावी. 30 सेंटिमीटर अंतरावर काकऱ्या मारून या गवताचे बी टाकावे अथवा बी फोकून पेरणी करावी. हेक्टरी 10 किलो बियाणे लागते.
- फुले क्रांती या पिकाचे महत्त्वपूर्ण जात आहे.
- या पिकाची कापणी तीस ते पस्तीस दिवसांच्या अंतराने करता येते. हिरव्या चाऱ्याचे 200 ते 800 क्विंटल प्रति हेक्टरी उत्पादन मिळते.
- चवळी:
- चवळी हे द्विदल वर्गातील चारा पीक आहे. त्यामध्ये प्रथिनांचे प्रमाण 13 ते 15 टक्के असते. मका व ज्वारी यासारख्या एकदल पिकाबरोबर मिश्र पीक किंवा आंतरपीक म्हणून हे पीक घेतले जाते.
- या पिकाची लागवड जून ते ऑगस्ट आणि उन्हाळी हंगामात फेब्रुवारी ते एप्रिल या कालावधीत कराव.
- चवळी चारा हिरवा किंवा वाळवून देता येतो.
- पेरणीसाठी 40 किलो बियाणे प्रति हेक्टरी लागते. मिश्र पिकासाठी 20 किलो बियाणे लागते.
- हिरव्या चाऱ्याचे हेक्टरी उत्पादन तीनशे ते साडेतीनशे क्विंटल इतके मिळते.
Share your comments