डिजिटल तंत्रज्ञानाच्या युगात दूध संकलनापासून ते दूध विक्री पर्यंत सर्वच कामे ऑनलाइन पद्धतीने झाली आहेत. पशुवैद्यकीय सेवा, सुविधा व जनावरांचा चारा, खाद्य व औषधे देखील ऑनलाईन पद्धतीने घरपोच मिळत आहेत. त्यामुळे पशुपालकांची होणारी पायपीट वाचली आहे. ओएलएक्सच्या माध्यमातून जसे आपण जुन्या गाड्यांची खरेदी व विक्री करू शकतो आपणाला पाहिजे ती किंमत टाकून आपण पाहिजे तो ग्राहक घरबसल्या मिळू शकतो ते ही कुठल्या उदारी व फसवणूकी शिवाय ग्राहकाला देखील त्याची किंमत, वय, रंग, इत्यादी माहिती घरी सर्वांना दाखवता येते त्यातून पसंतीही करता येते.
हे झाले ऑटोमोबाईल क्षेत्राविषयी परंतु जनावरांविषयी ऑनलाईन बाजार हे कधी ऐकलय कां? हो आहे असा एक धेनू अँप मधील पशु बाजार इथे असतात आपणाला लागणाऱ्या सर्व जातीच्या लहान मोठ्या गाई, म्हशी, शेळ्या, मेंढया एकत्रित पहायला मिळतात. आठवडा बाजार तरी आठवड्यातून एकदा भरतो आपल्याला आठवड्या बाजारामध्ये जनावर खरेदी करण्यासाठी जावेच लागते, जनावरे पसंत पडली तर घ्यावे लागते अन्यथा माघारी परतावे लागते.
परंतु धेनू अँप मधील पशुबाजार हा पशुपालक बांधवांसाठी ३६५ दिवस सुरू असतो. यामध्ये आपल्या आवडीचे, आपल्या दूध उत्पादनाच्या गरजेनुसार तसेच किमतीनुसार हवे ते जनावर आपण खरेदी करू शकता आणि हव्या त्या किमतीला आपण जनावरे विकू शकता. यामध्ये जनावर ने-आण करण्याचा खर्च वाचतो, त्यामुळे जनावरांचे हाल होत नाहीत गर्भपातापासून मुक्ती मिळते, जनावरांच्या अंगाला जखमा होत नाहीत, जनावरांच्या अंगाला ताठरता येत नाही, आणि ताण-तनावापासून जनावर दूर राहते. चला तर मग जाणून घेऊया धेनू अँप मधील पशु बाजारची ठळक वैशिष्ट्ये
• पशु बाजारची ठळक वैशिष्ठे-
१) पशु बाजारमध्ये सहज आपण गाय, म्हैस, शेळी, मेंढी इत्यादी प्राण्यांची खरेदी-विक्री करू शकता.
२) पशु बाजारमध्ये आपल्या परिसरात विक्रीस असणाऱ्या प्राण्यांच्या फोटोसह वय, रंग, अपेक्षीत किंमत, तुमच्या पासुन ते अंतर किती (कि.मी) आहे तसेच त्याचे स्थान ही तुम्ही पाहू शकता.
३) आपण पशु बाजारमध्ये वर्गीकरणा नुसार जनावराचे स्थान, प्रकार, लिंग, जात, दैनिक दूध उत्पादन (लि), विताची संख्या, गर्भधारणा कालावधी (महिने) इत्यादी गोष्टींची माहिती घेऊ शकता.
४) जास्त लोकप्रिय मागणीची जनावरे आपण पशु बाजार मध्ये पाहू शकता तसेच त्यानुसारही खरेदी करू शकता.
५) पशु बाजारमध्ये आपण घरबसल्या जनावरे विकू शकता त्यासाठी आपल्याला जनावर कोठेही ने-आण करण्याची गरज भासत नाही.
६) पशु बाजारमधील आपल्याला जनावर आवडले असल्यास त्या ठिकाणावर जाऊन जनावराची रोख खरेदी देखील करू शकता.
७) पशु बाजार मधील प्राणी आवडल्यास आपण त्या विक्रेत्याला फोन करून विक्रीबाबत किंव्हा प्राण्यांबाबत अधिक माहिती घेऊ शकता.
८) पशु बाजारमध्ये विक्रीला असलेल्या किंव्हा विक्री झालेल्या जनावरांची माहिती आपणाला घरबसल्या मिळते.
९) सामान्य जनावरांच्या बाजारामध्ये जनावरांबद्दल सखोल माहिती मिळत नाही किंव्हा त्यांच्याकडे पूर्वीचे रेकॉर्ड नसते त्यामुळे धेनू अँप मधील पशू बाजार मधून जनावर खरेदी केल्यास रेकॉर्ड सहित सर्व माहिती मिळते.
१०) सामान्य बाजारामध्ये गाईचे दूध काढून तिचे दूध उत्पादन किती आहे हे तपासणे खूप अवघड जाते.
११) बाजारामध्ये विक्रीस आणलेल्या जनावरांना इतर जनावरांपासून संसर्गजन्य आजार होण्याची जास्त शक्यता असते.
१२) जनावरांच्या आठवडी बाजारामध्ये चोरीचे सुद्धा जनावर असण्याची शक्यता असते त्यामुळे जास्त अडचणी निर्माण होऊ शकतात.
१३) पशु बाजारमध्ये थेट ग्राहकाचा विक्रेत्यांशी संपर्क झाल्यामुळे दलालीचा प्रश्नच उरत नाही उलट जनावर चांगल्या किंमतीला विकू शकते.
१४) पशु बाजारच्या माध्यमातून जनावरे खरेदी करताना थेट मालकाच्या गोठ्यावरील त्या जनावराच्या आहाराचे, चाऱ्याचे, गोठ्याचे व्यवस्थापना संदर्भातील बाबी पाहण्यास मिळतील त्यानुसार आपल्या गोठ्यातील व्यवस्थापन करणे सोईचे होईल.
१५) पशुधनाची योग्य खरेदी हि अतिशय महत्वाची बाब असून ९०% पशुपालक लक्षात घेत नाहीत आणि त्यामुळे आहार व्यवस्थापनातील खर्च वाढून योग्य ते पूर्वीचे व्यवस्थापन न झाल्याने आवश्यक दूधउत्पादन मिळत नाही.
पशुपालकांनो!! दुग्धव्यवसायातील डिजिटल तंत्रज्ञान जाणून घेण्यासाठी आजच प्ले स्टोर वरून Dhenoo App डाऊनलोड करा आणि आपला दुग्धव्यवसाय दुपटीने वाढवा...
लिंक -https://play.google.com/store/apps/details?id=com.dhenoo.tech&referrer=XXPBY3
लेखक-
नितीन रा.पिसाळ
प्रकल्प समन्वयक/(डेअरी प्रशिक्षक)
धेनू टेक सोल्युशन्स प्रा.लि भोसरी,पुणे.
मो.बा- 9766678285. ईमेल-nitinpisal94@gmail.com
महत्वाच्या बातम्या;
शेतकऱ्यांनो अतिरिक्त उसाची माहिती 'या' नंबरवर द्या, तरच होणार तोडीचे नियोजन, सरकारने केले नियोजन..
शेतकऱ्यांचा ७/१२ होणार कोरा, कोण ठरले भाग्यवान? वाचा लिस्ट...
Share your comments