1. पशुधन

पोल्ट्री शेडची स्वच्छता आणि योग्य व्यवस्थापन, आहे पोल्ट्री व्यवसायातील यशाचे गमक

पोल्ट्री उद्योग हा सध्या शेतीला जोड धंदा म्हणून राहिला नाहीतर एक मोठ्या उद्योगाचे स्वरूप धारण करीत आहे. बरेच तरुण शेतकरी मित्र या उद्योगाकडे वळताना दिसत आहेत. पोल्ट्री उद्योगात असा खूप फायद्याचा व्यवसाय आहे. अचूक तंत्रज्ञान,योग्य व्यवस्थापन आणि पोल्ट्री उद्योगातील व्यावसायिक बारकावे लक्षात घेऊन जरा व्यवसाय केला तर उत्तम प्रकारे आर्थिक स्त्रोत निर्माण होऊ शकतो.

पाटील रत्नाकर अशोक
पाटील रत्नाकर अशोक
poultry shed

poultry shed

 पोल्ट्री उद्योग हा सध्या शेतीला जोड धंदा म्हणून राहिला नाहीतर एक मोठ्या उद्योगाचे स्वरूप धारण करीत आहे. बरेच तरुण शेतकरी मित्र या उद्योगाकडे वळताना दिसत आहेत. पोल्ट्री उद्योगात असा खूप फायद्याचा व्यवसाय आहे. अचूक तंत्रज्ञान,योग्य व्यवस्थापन आणि पोल्ट्री उद्योगातील व्यावसायिक बारकावे लक्षात घेऊन जरा व्यवसाय केला तर उत्तम प्रकारे आर्थिक स्त्रोत निर्माण होऊ शकतो.

 यामध्ये बऱ्याच प्रकारचे कंगोरे येतात जसे की शेडमधील लहान पिल्ले आल्यापासून ते त्यांच्या विक्रीपर्यंत तसेच तापमान नियंत्रण,शेडची स्वच्छता, वेळेत लसीकरण अशा बहुतेक गोष्टींवर बारकाईने लक्ष ठेवून नियोजन करावे लागते. या लेखात आपण पोल्ट्री व्यवसायात शेडची स्वच्छता किती महत्त्वाचे आहे व ती कशी करावी याबद्दल जाणून घेणार आहोत.

 पिल्ले येण्यापूर्वी शेडचे स्वच्छता कशी करावी?

  • कोंबड्यांचा अगोदरचा लॉट विक्रीला गेल्यानंतर पुढच्या प्लॉटची पिल्ले येण्यापूर्वी शेड स्वच्छ आणि टापटीप करून ठेवावे.
  • शेड मधील सर्व कोंबडी खत आणि पडलेला कचरा वगैरे जमा करून पोत्यांमध्ये भरून ठेवावा किंवा विक्रीसाठी पाठवून द्यावा.

 

  • जर कधीच खत विक्री करणे शक्य नसेल तर खेड मधून काढलेले खत शक्य तेवढ्या शेड पासून दूर ठेवावे. यात विशेष म्हणजे खताची साठवणूक उत्तर अथवा दक्षिण या दोन्ही बाजूंना करू नये.
  • शेड स्वच्छ करताना त्यामध्ये खत राहणार नाही याची काळजी घ्यावी तसेच कोंबड्यांची पिसे शेडमध्ये कुठेच राहणार नाहीत याची काळजी तंतोतंत घ्यावी.
  • खत काढल्यानंतर शेड स्वच्छ धुवावे. पोल्ट्री शेड धुतांना प्रति 10 लिटर गरम पाण्यात 400 ग्राम अन धुण्याचा सोडा टाकून बनवलेले द्रावण की सहा तासांसाठी टाकून ठेवावे. हे मिश्रण शेडमध्ये सगळीकडे व्यवस्थित पद्धतीने पोहोचली याची काळजी घ्यावी.
  • त्यानंतर दहा लिटर पाण्यामध्ये 200 ग्रॅम कॉस्टिक सोडा मिसळलेलेद्रावणबारा तासांसाठी सर्व भागात पोहोचेल असेच टाकूनठेवावे. नंतर सर्व शेड पाण्याने स्वच्छ धुवावे.
  • तसेच पोल्ट्री शेड मधील फिडर आणि ड्रिंकर हायड्रोक्लोराइड या ऍसिडचा वापर करून स्वच्छ धुवावे.
  • पोल्ट्री शेडच्या आजूबाजूला लावलेले पडदे काढुन स्वच्छ धुवुन घ्यावेत. किंवा निर्जंतुक करून घ्यावेत.
  • शेडमध्ये पडदे लावल्यावर दहा लिटर पाण्यामध्ये अर्धा लिटर फार फार्मोलीनचे द्रावण करून फवारणी करावी.
  • शेडच्या भिंती तसेच खालचा कोबा वगैरे यावर चुना पावडर, रॉकेल आणि फॉर मुलीने यांचा रंग देऊन निर्जंतुकीकरण करावे.
English Summary: cleaness of poultry shed is important in poultry industriy Published on: 29 September 2021, 10:46 IST

Like this article?

Hey! I am पाटील रत्नाकर अशोक. Did you liked this article and have suggestions to improve this article? Mail me your suggestions and feedback.

Share your comments

आमच्या न्यूसलेटरचे सदस्य व्हा. शेती संबंधीत देशभरातील आताच्या बातम्या मेलवर वाचण्यासाठी आमच्या न्यूसलेटरची सदस्यता घ्या.

Subscribe Newsletters