1. पशुधन

Animal Care : ज्वारीच्या किरळामुळे जनावरांना होणाऱ्या विषबाधेची कारणे आणि उपाय

सायनोजिनीक ग्लुकोसाईडचे प्रमाण एक महिन्यापर्यंतच्या कोवळ्या आणि जमिनीलगतच्या फुटव्यामध्ये भरपूर असते विशेषतः खोडापेक्षा पानांमध्ये याचे प्रमाण जास्त असते. ज्वारीच्या पानामधील सायनोजिनीक ग्लुकोसाईडचे प्रमाण सूर्योदयापासून दुपार पर्यंत वाढत जातो व परत संध्याकाळ होईल तसे कमी कमी होऊ लागते.

KJ Maharashtra
KJ Maharashtra
Animal Husbandry News

Animal Husbandry News

ऐश्वर्या राठोड, डॉ. आदिनाथ ताकटे 
ज्वारी हे महाराष्ट्रातील प्रमुख तृणधान्य पीक आहे. अन्नधान्यांच्या बरोबर ज्वारीपासून कडब्याच्या स्वरूपात जनावरांना चाराही मिळतो. ज्वारीच्या एमपी चारी, निळवा, रुचिरा, पुसाचारी, फुले अमृता या वाणांचा उपयोग शेतकरी फक्त पेरणीसाठी करतो. तसेच अगदी प्रतिकूल हवामानातही मक्यासारख्या पिकांच्या मानाने  ज्वारी हे पीक चांगले येत असल्यामुळे शेतकरी या पिकांची चारा पीक म्हणून मोठ्या प्रमाणत लागवड करतो.
परंतु हे पीक महिन्यापर्यंत असताना त्याची पाने, खोडे व मुळामध्ये सायनोजिनीक ग्लुकोसाईड नावांचे रसायन असते. त्याला “धूरीन” असे म्हणतात. एक महिन्यांपर्यंतचे ज्वारीचे रोप जनावरांच्या खाण्यात आल्यानंतर जनावरांच्या पोटामध्ये सायनोजिनीक ग्लुकोसाईडचे रूपांतर हेड्रोसायनिक आम्ल (HCN) ह्या अत्यंत विषारी अशा आम्लामध्ये होते आणि जनावर दगावते. यालाच आपण जनावराला "किरळ" लागले असे म्हणतो.
सायनोजिनीक ग्लुकोसाईडचे प्रमाण एक महिन्यापर्यंतच्या कोवळ्या आणि जमिनीलगतच्या फुटव्यामध्ये भरपूर असते विशेषतः खोडापेक्षा पानांमध्ये याचे प्रमाण जास्त असते. ज्वारीच्या पानामधील सायनोजिनीक ग्लुकोसाईडचे प्रमाण सूर्योदयापासून  दुपार पर्यंत वाढत जातो व परत संध्याकाळ होईल तसे कमी कमी होऊ लागते. तसेच पावसाळ्यापेक्षा उन्हाळी हंगामातील  ज्वारीमध्ये कमी आर्द्रता व अधिक बाष्पीभवनामुळे सायनोजिनीक ग्लुकोसाईडचे प्रमाण वाढते. तसेच कोवळा ज्वारीचा खोडवा व जरुरी पेक्षा नत्र खताचा जास्त हप्ता दिलेल्या ज्वारीमध्ये या रसायनाची प्रमाण जास्त असते. अशी ज्वारी जनावरांच्या खाण्यात आल्यास त्यातील ग्लुकोसाईडचे रूपांतर हाड्रोसायनिक अॅसिड मध्ये होऊन जनावर दगावते.

ज्वारीचे "किरळ" लागू नये यासाठी ज्वारी पिकांची कापणी पीक फुलोऱ्यात आल्यानंतरच करावी. तसेच ज्वारीचा कडबा व मूरघास यामध्ये हायड्रोसायनिक आम्ल नसल्यामुळे त्यांचा जनावरांना चारा म्हणून वापरण्यास काहीही हरकत नाही .

खबरदारी आणि उपाययोजना
ज्वारी उगवल्यानंतर ४० दिवसांपर्यंत तसेच कापणीनंतर फुटवे वाढीच्या वेळी हायड्रोसायनिक आम्लाची निर्मिती होत असते. हे रसायन जहाल विषारी असल्यामुळे कोवळे फुटवे किंवा चारा ४० दिवसांपर्यंत जनावरांना खाण्यास अयोग्य असतो. म्हणून कोणत्याही परिस्थितीत ४० दिवसांपूर्वी ज्वारीची कापणी करू नये.

कोरडवाहू क्षेत्रातील ज्वारीला जरुरीप्रमाणे पाणी देल्यास पिकांची वाढ जोमदार होते आणि पर्यायाने हायड्रोसायनिक आम्लाचे प्रमाण कमी होते. ज्वारी पिकाची चाऱ्यासाठी कापणी करावयाची झाल्यास ज्वारी फुलोऱ्यात असल्यानंतरच करावी. जनावरास "किरळ" लागल्यास ताबडतोब मोलॅसिअसचे दोन डोस तोंडावाटे द्यावेत. यामुळे विषबाधा झालेल्या जनावरांना अधिक शक्ती मिळते आणि जनावर काही तास जगू शकतो. त्यानंतर ताबडतोब पशुवैद्याकडून जनावरास सोडियम थायोसल्फेटचे इंजेक्शन द्यावेत. यामुळे विषबाधा झालेल्या जनावराच्या शरीरातील ऑक्सिजनचा पुरवठा पूर्ववत होतो व जनावरांचे प्राण वाचतात.

विषबाधेची कारणे
ज्वारीच्या कोवळ्या पोंग्यामध्ये धुरीन नावाचा विषारी घटक असतो. जनावरांनी पोंगे खाल्यानंतर पोटात धुरीनपासून हायड्रोसायनिक अॅसिड तयार होते. हे हायड्रोसायनिक अॅसिड ॲसिड जनावरांमध्ये विषबाधा करते.

लक्षणे
जनावरांनी पोंगे कमी प्रमाणात खाल्ले तर जनावराचे पोट दुखते, जनावर अस्वस्थ होऊन श्वासोश्वास व ह्रदयाचे ठोके वाढतात
जनावरांनी ज्वारीचे कोवळी पोंगे जास्त प्रमाणात खाल्ले तर जनावरांचा ताबडतोब मृत्यू होतो.
जनावरे थरथर कापते व बेशुद्ध पडते, हृदय बंद पडल्याने शेवटी जनावर दगावते.

घ्यावयाची काळजी
ज्वारीची कोवळे पोंगे जनावरे खाणार नाहीत याची पशु पालकांनी काळजी घ्यावी .
ज्वारीचे पीक कापल्यानंतर, शेतात पाणी सोडल्यानंतर, पुन्हा ज्वारीचे पोंगे तयार होतात अशा शेतात जनावरे चरावयास सोडू नयेत.

लेखक - ऐश्वर्या राठोड, आचार्य पदवी विद्यार्थी, कृषिविद्या विभाग, महात्मा फुले कृषि विद्यापीठ, राहुरी, मो. ८४११८५२१६४
डॉ. आदिनाथ ताकटे, मृदा शास्त्रज्ञ, एकात्मिक शेती पद्धती, महात्मा फुले कृषि विद्यापीठ, राहुरी. मो. ९४०४०३२३८९

English Summary: Causes and Remedies of Sorghum Germ Poisoning in Animals Published on: 03 November 2023, 03:58 IST

Like this article?

Hey! I am KJ Maharashtra. Did you liked this article and have suggestions to improve this article? Mail me your suggestions and feedback.

Share your comments

आमच्या न्यूसलेटरचे सदस्य व्हा. शेती संबंधीत देशभरातील आताच्या बातम्या मेलवर वाचण्यासाठी आमच्या न्यूसलेटरची सदस्यता घ्या.

Subscribe Newsletters