जनावरांना बऱ्याचदा विषबाधा होतेव विषबाधा होण्याची कारणे देखील वेगवेगळे असतात. परंतु जनावरांना विषबाधा झाली आणि वेळीच लक्ष दिले नाही तर जनावरे दगावण्याचा धोका असतो.
परंतु या कारणांमध्ये ज्वारीचे कोवळे पोंगे हे मुख्य कारण असू शकते. जर जनावरांनी ज्वारीचे पीक लहान अवस्थेत असताना खाल्ले तर त्यांना विषबाधा होऊ शकते. तसे पाहायला गेले तर ज्वारीचे धाटे म्हणजे पोंगे खाण्यामुळे होणाऱ्या विषबाधेचे प्रमाण रब्बी हंगामात जास्त असते. बहुतांशी जनावरे दगावल्याची घटना या रब्बी हंगामात घडतात. जनावरांनी जर ज्वारीचे पीक लहान अवस्थेत असताना खाल्ले तर त्यांना विषबाधा होऊ शकते. त्यामुळे पशुपालकांनी काळजीपूर्वक लक्ष देणे खूप गरजेचे आहे. ज्वारीच्या कोवळ्या पोंग्यामध्ये धुरीन नावाचा विषारी घटक असतो. जनावरांनी कोवळी ज्वारी खाल्ल्यानंतर पोटात धुरीन पासून हायड्रोसायनिक ऍसिड तयार होते.यामुळे जनावरांमध्ये विषबाधा होते.
ज्वारीच्या कोवळ्या पोंगा खाल्ल्यामुळे होणाऱ्या विषबाधेची लक्षणे
1- ज्वारीची कोवळी पोंगे जास्त प्रमाणात खाल्ले तर जनावरांचा ताबडतोब मृत्यू होतो.
2- कमी प्रमाणात खाल्ले तर जनावरांचे पोट दुखते तसेच जनावरे अस्वस्थ होतात. त्यांच्यातील श्वासोश्वास व हृदयाच्या ठोक्यांची गती वाढते व श्वास घ्यायला त्रास होतो.
3-जनावरे थरथर कापत व बेशुद्ध देखील पडतात. हृदय बंद पडल्याने शेवटी जनावर मरते.
यावर उपचार
1- जनावरांचे पोट फुगलेले असते त्यामुळे सर्वप्रथम पोटातील हवा काढावी.
2- पशुवैद्यकीय डॉक्टरांच्या सल्ल्याने गाय आणि म्हशींना सोडियम नायट्रेट तीन ग्रॅम, सोडियम सल्फेट 15 ग्रॅम 200 मिली शुद्ध पाण्यात मिसळून शिरे द्वारा टोचावे.
3- ही विषबाधा जर शेळ्या आणि मेंढ्यांमध्ये झाली तर तीन ग्रॅम सोडियम नायट्रेट, पाच ग्रॅम सोडियम सल्फेट 50 मिली शुद्ध पाण्यात मिसळून शिरे द्वारे टोचावे.
(वरील उपचार करताना पशुवैद्यकाचा सल्ला घ्यावा.)
प्रतिबंधात्मक उपाय
1-जनावरे ज्वारीचे कोवळे पोंगे खाणार नाहीत याकडे काळजीपूर्वक लक्ष देणे गरजेचे आहे.
2- जर ज्वारीचे पीक लहान अवस्थेत खराब झाली असेल तर असे पोंगे उन्हात वाळल्या नंतरचजनावरांच्या खाद्यामध्ये घ्यावेत कारण वाळल्यानंतर त्यामधील विषारी घटकांचे प्रमाण कमी होते.
3- ज्वारीचे पिकाची कापणी झाल्यानंतर पुन्हा ज्वारीच्या शेतात पाणी सोडले तर पुन्हा ज्वारीचे पोंगे तयार होतात. अशा शेतामध्ये आपली जनावरे चरण्यासाठी सोडू नयेत.
महत्वाच्या बातम्या
नक्की वाचा:क्षणात झाले होण्याचे नव्हते, कोकणातील शेतकरी मोठ्या संकटात
नक्की वाचा:बातमी कामाची! किडींच्या प्रादुर्भावावर सापडला उपाय, शेतकऱ्यांनो जाणून घ्या
Share your comments