दुग्धव्यवसाय करणारे आणि डेअरी व्यवसाय करणाऱ्या शेतकऱ्यांसाठी एक आनंदाची बातमी आहे. इतर उद्योगकर्त्यांना ज्या प्रमाणे सल्ला आणि माहिती काही सेंटरच्या माध्यमातून मिळत असते. अगदी त्याचप्रमाणे डेअरी व्यवसाय करणारे आणि दुग्धव्यवसाय करणाऱ्या शेतकऱ्यांसाठी नॅशनल डेअरी विकास मंडळाने (National Dairy Development Board or NDDB ) ने (Pashu Mitra) पशु मित्र नावाचे कॉल सेंटर सुरू केले आहे. या कॉल सेंटरमधून शेतकरी पशुंविषयी माहिती घेऊ शकतील. पशुंचा आहार, आजार, जातीविषयीही माहिती या कॉल सेंटरमधून मिळणार आहे.
बऱ्याच वेळी अनेक शेतकरी गायी किंवा म्हैशी घेऊन डेअरी किंवा दुग्धव्यवसाय सुरू करत असतात. परंतु त्यांना पशुंच्या आहाराविषयी माहिती नसते. आजाराविषयीही लवकर माहिती मिळत नाही. यामुळे त्यांच्या उत्पादन क्षमतेवर परिमाण होत असतो. काहीजण नेहमीच्या काम चालाऊ पणे डेअरीचा व्यवसाय करत असतात. पण शास्त्रीय पद्धतीने दुग्धव्यवसाय किंवा डेअरी व्यवसाय कसा करायचा हे माहिती नसते. याचीच माहिती या कॉल सेंटरमधून मिळणार आहे.
या सेंटरमध्ये संपर्क साधल्यानंतर शेतकरी पशुंविषयीच्या समस्यांचे निराकरण होणार आहे. एनडीडीबी या कॉल सेंटरमार्फत शेतकऱ्यांना फक्त माहितीच देणार नाहीत तर शेतकऱ्यांचा खरा मित्र म्हणून साथ देणार आहे. देशातील डेअरी व्यवसाय आणि दुग्धव्यवसाय वाढण्यासाठी प्रोत्साहन मिळावे. शेतकऱ्यांना डेअरी व्यवसायाविषयीची आवड निर्माण व्हावी हा उद्देश पशु मित्र या कॉल सेंटरचा असल्याचं एनडीडीबीचे अध्यक्ष दिलीप राथ यांनी सांगितले.
शेतकरी संकटाच्या काळात पशु मित्राच्या विशेष मदत मिळू शकतील. शास्त्रीय पद्धतीने डेअरी व्यवसाय कसा करायचा याविषयीची जागृती देखील यातून केली जाणार आहे. दरम्यान शेतकरी आपल्या पशुविषयीची माहिती, जनावरांना होणाऱ्या आजाराविषयीची माहिती, लक्षणे, उपाय, पशुंचा आहार, पौष्टिक आहार कोणता याची माहिती या पशु मित्र कॉल सेंटर मधून शेतकऱ्यांना मिळणार असल्याचेही राथ यांनी सांगितले. दरम्यान पशुंच्या समस्यांचे निराकरण करण्यासाठी शेतकऱ्यांना फक्त ‘7574835051’ या नंबर संपर्क करावा लागेल. त्यानंतर एनडीडीबीच्या तज्ज्ञांकडून सर्व प्रश्नांची उत्तरे दिले जातील. हे कॉल सेंटर आठवड्यातील पाच दिवस चालणार असून संपर्क करण्याचा वेळ हा साडे नऊ ते ६ वाजेपर्यंतच्या दरम्यान असणार आहे. जर आपला संपर्क होऊ शकला नाहीतर शेतकरी आपला एक रेकॉर्ड केलेला मेसेज पाठवू शकतील. त्यानंतर कामाच्या वेळात एनडीडीबीचे तज्ज्ञ आपल्या मेसेजचे उत्तर देतील.
Pashu Mitra call centre details पशु मित्र कॉल सेंटरची सविस्तर माहिती
मोबाईल नंबर - 7574835051
कामाचे दिवस - सोमवार ते शुक्रवार
कामाची वेळ - 9.30 am to 6 pm
Share your comments