मत्स्य पालन हा एक असा व्यवसाय आहे ज्यामध्ये तुम्ही कमी खर्चात जास्त नफा मिळवूशकतात. मत्स्यपालन भारतातील सगळ्या राज्यांमध्ये केले जाते. भारतामध्ये 70 टक्के लोक असे आहेत की जे माशांचे सेवन करतात. भारतातच नाही तर पूर्ण जगात माशांची मागणी दिवसेंदिवस वाढतच आहे.
या लेखात मत्स्यपालनाचा एका विशेष प्रकाराबद्दल आपण जाणून घेणार आहोत. ज्याद्वारे मत्स्य पालकांना चांगले उत्पन्न मिळेल. तो प्रकार मध्ये पिंजरा मधील मत्स्यपालन हेहोय. त्याबद्दल या लेखात माहिती घेऊ.
पिंजरा मत्स्यपालन नेमके काय आहे?
पिंजऱ्यामध्ये मत्स्यपालन करण्याला मेरी कल्चर असेदेखील म्हणतात.या प्रकारात मत्स्य पालन करण्यासाठी पिंजरा बनवण्यासाठी अडीच मीटर लांब, अडीच मीटर रुंद आणि दोन मीटर उंचीचा बॉक्स बनवावा लागतो.या बॉक्समध्ये मध्ये मत्स्यबीज टाकले जाते आणि बॉक्स च्या चारही बाजूंना सीविड्स लावावे लागते.
पिंजरा मधील मत्स्य शेतीचे फायदे
- या मध्ये माशांचा चांगला विकास होतो.
- फार कमी दिवसात माशांची चांगली वाढ होते.
- शेतकऱ्यांना अधिकचा नफा होतो.
पिंजरा मधील मत्स्य पालन कसे असावे?
- या द्वारे मत्स्यपालन दोन प्रकारच्या पिंजऱ्यात केले जाते.पहिला म्हणजे पिंजरा एका जागेवर स्थिर ठेवला जातो आणि दुसऱ्या प्रकारात पिंजरा हा तरंगत असतो.
- स्थिर पिंजरा ला बनवण्यासाठी पाण्याची खोली पाच मीटर असणे आवश्यक आहे.
- तरंगणाऱ्या पिंजऱ्यासाठी पाण्याची खोली पास मीटरपेक्षा अधिक आवश्यक आहे.
- ऑक्सिजनचे मात्रा भरपूर प्रमाणात असावी.
- पिंजरा मध्ये जवळजवळ दहा फूट पाणी असावे.
शेतीसोबत पिंजरा मत्स्य पालना चे फायदे
भातशेती करणाऱ्या शेतकऱ्यांसाठी हा एक चांगला पर्याय आहे. भात शेती करणारे शेतकरी शेतामध्ये जमा झालेल्या पाण्यामध्ये मच्छी पालन करू शकतात. ज्याला आपण फिश राईस फार्मिंग असे म्हणतो. या पद्धतीने भात शेती सोबतच मत्स्यपालन सुद्धा करता येते. त्यामुळे शेतकऱ्यांना भातशेती पासून मिळणारे उत्पादन तर मिळतेच परंतु सोबत मच्छी विक्रीतून चांगला नफा देखील मिळेल. भातशेतीमध्ये मत्स्य पालन केल्यामुळे भात पिकावर येणाऱ्या अनेक रोगांपासून मुक्तता मिळते.
Share your comments