
Buffaloes who give 20 to 30 liters of milk day
आपल्या देशात शेतकरी मोठ्या प्रमाणावर कष्ट करतात. मात्र त्यांना त्याचा मोबदला मिळत नाही. यामुळे अनेक शेतकरी हे आत्महत्या करतात. तसेच देशात मोठ्या प्रमाणावर शेतकरी हे दुग्धव्यवसाय करतात. यामध्ये देखील चांगल्या जातीच्या गाई किंवा म्हशी असतील जेणेकरून त्या जास्त दूध देतील तेव्हा शेतकऱ्यांना चार पैसे मिळतात गावात राहणारे शेतकरी म्हशी पालन व्यवसाय करून चांगला नफा कमवू शकतात. अशा परिस्थितीत म्हशींची योग्य पद्धतीने निवड करणे सर्वात महत्त्वाचे आहे.
शेतकऱ्यांनी कमी दूध देण्याची क्षमता असलेल्या अशा म्हशीच्या जातीची निवड केली असेल, तर तुमचा व्यवसाय करून काही फायदा होत नाही. यामुळे जातीची निवड करताना माहिती घेऊन योग्य निवड करणे गरजेचे आहे. देशात अशा काही म्हशींच्या जाती आहेत की त्या मोठ्या प्रमाणावर दूध देतात. यामध्ये मुर्राह जातीच्या म्हशींना जगातील सर्वात दुधाळ प्राणी मानले जाते.
या म्हशी एका दिवसात 13-14 लिटर दूध देतात. यामुळे ही देखील फायदेशीर जात आहे. तसेच मेहसाणा म्हैस एका दिवसात 20 ते 30 लिटर दूध देते. गुजरातमध्ये शेतकरी या म्हशींचे पालन मोठ्या प्रमाणावर करतात. तसेच आपल्या महाराष्ट्रात आढळणारी पंढरपुरी म्हैस तिच्या दुग्धशक्तीसाठीही ओळखली जाते. ही म्हस देखील चांगले खाद्य दिल्यास चांगले दूध देते. यामुळे हा व्यवसाय करणे परवडते.
आता शेतकऱ्यांना 3 लाखांपर्यंत बिनव्याजी कर्ज मिळणार!
केवळ खाद्य आणि इतर खर्च केला आणि दूध जास्त मिळत नसेल तर मात्र यामध्ये परवडणार नाही. तसेच दुग्धोत्पादनाच्या बाबतीत सुर्ती जातीच्या म्हशीही मागे नाहीत. या दोन्ही म्हशी दरवर्षी सरासरी 1400 ते 1600 लिटर दूध देतात. तसेच संभळपुरी म्हैस, निली-रवी म्हैस, तोडा म्हैस, सातकणरा म्हैस, जाफ्राबादी दुग्ध व्यवसाय करणाऱ्या शेतकऱ्यांसाठी चांगल्या आहेत.
शेतकऱ्यांनो आता पॉलिहाऊसचा खर्च वाचणार, प्लॅस्टिक बोगद्याची शेती ठरतेय फायदेशीर, जाणून घ्या..
यामुळे याकडे शेतकऱ्यांनी लक्ष देणे गरजेचे आहे. या सर्व म्हशी दरवर्षी 1500 लिटर ते 2000 लिटर दूध देतात. देशात ग्रामीण भागात शेतकरी शेती (Agriculture) आणि पशुपालनाच्या (Animal Husbandry) मदतीने आपला आर्थिक (Financial) उदरनिर्वाह आहेत.
महत्वाच्या बातम्या;
आता एकाच झाडावर टोमॅटो, वांगी, बटाटे, शास्त्रज्ञांनी केली शेतीमध्ये क्रांती
काय सांगता! आता मोबाईल अॅपवर करा जनावरांची विक्री, दुधाचे प्रमाणही समजणार
लाथ मारीन तिथे पाणी काढीन! बीडच्या पठ्याने दुष्काळी भागात केली सफरचंदाची बाग
Share your comments