भारतात शेतकरी पशुपालन व्यवसाय (Animal husbandry business) मोठ्या प्रमाणात करत असतात. यामध्ये म्हैस पालनावर जास्त भर देतात. म्हशीच्या अनेक जाती प्रजाती आहेत. या प्रजातींमध्ये आफ्रिकन म्हैस, जंगली म्हैस आणि पाण म्हैस यांचा समावेश होतो.भारतात भारतीय म्हैस हा प्रमुख प्रकार आढळतो.
आता आपण पाहीले तर सध्या उत्तर प्रदेश (Uttar Pradesh) मधील एका म्हशीची देशात खुपच चर्चा सुरू आहे. उत्तर प्रदेशातील मेरठमध्ये तीन दिवसीय अखिल भारतीय किसान मेळावा (All India Kisan festival) आयोजित केला जात आहे. या जत्रेच्या पहिल्याच दिवशी एका म्हशीने लोकांना मोठ्या संख्येने आकर्षित केले आहे.
सावधान! जेवल्यानंतर ताबडतोब झोपत असाल तर होऊ शकतात गंभीर आजार; वाचा सविस्तर
जाणून घ्या या म्हशीबद्दल
हरियाणाचे शेतकरी पद्मश्री पुरस्काराने सन्मानित असलेले नरेंद्र सिंह आपल्या म्हशीसह या जत्रेत पोहोचले होते. येथे नरेंद्र सिंह आपली 10 कोटी रुपयांची गोलू 2 म्हैस घेऊन आले होते. ही म्हैस मुर्रा प्रजातीची असून तिचं वजन तब्बल 15 क्विंटल आहे.
परतीच्या पावसामुळे पिकांचे नुकसान; कृषी विभागाकडून सल्ला, तूर आणि भाजीपाला पिकांची घ्या 'अशी' काळजी
म्हशीचा आहार
म्हशीची किंमत करोडो रुपये आहे. या म्हशीची देखरेक आणि त्यांची विशेष काळजी घ्यावी लागते. गोलूचा रोजचा खर्च (Daily expenses of Golu) सुमारे एक हजार रुपये आहे.
म्हशीच्या आहारात 30 किलो कोरडा हिरवा चारा (dry green fodder), 7 किलो गहू हरभरा आणि 50 ग्रॅम खनिज मिश्रणाचा समावेश असतो. महत्वाचे म्हणजे म्हशीच्या वीर्यातून चांगले उत्पन्न मालकाला मिळते. या म्हशीची किंमत तब्बल 10 कोटी रुपये असल्याचा अंदाज आहे.
महत्वाच्या बातम्या
शेतकऱ्यांची दिवाळी होणार गोड; 2 लाख शेतकऱ्यांच्या खात्यात 273 कोटी नुकसान भरपाई जमा
शेतकऱ्यांसाठी खुशखबर; तब्बल 14 जिल्ह्यांना मिळणार नुकसान भरपाई, शासन निर्णय जारी
सावधान! मुंबईतून तब्बल 400 किलो भेसळयुक्त तूप जप्त; अन्न व औषधी विभागाने दिली माहिती
Share your comments