दुग्ध उत्पादनासाठी म्हशीपालन आहे बेस्ट; राज्यात पाळल्या जातात ‘या’ म्हशी

16 October 2020 05:30 PM


भारतात म्हशींची संख्या १०८.७० लाख आहेत यातील १९० लाख जनावरे दुधासाठी उपयोगात आणली जातात. पिकाचे अवशेष, कडधान्य, गवत यांचे दुधात रूपांतरित करण्याची अनन्य क्षमता या जनावरांमध्ये (म्हशींमध्ये ) आहे. दुधाचे उत्पादन भरघोस देण्यास आणि कठोर वातावरणास तोंड देण्यासाठी म्हशी सक्षम असतात. दुग्धव्यवसाय करण्यासाठी म्हशी पालन हे खूप फायद्याचे ठरते. कारण दूध देण्याची क्षमता अधिक असल्याने डेअरी व्यवसायिकांना जबरदस्त फायदा होत असतो.   

महाराष्ट्रातील म्हशींच्या काही जाती ज्या पूर्ण जगभर प्रसिद्ध आहेत. यातील काही जातीची माहिती आपण घेणार आहोत :

पंढरपुरी (धारवारी) :

पंढरपुरी जातीच्या म्हशी फार शक्तिशाली, कोरड्या स्थितीस फार  अनुकूल आहेत. पंढरपुरी जातीच्या म्हशी मूळ: कोल्हापूर, सोलापूर, सांगली, सातारा, बेलगाव या ठिकाणी भरपूर संख्येने आढळून येतात.

 शारीरिक रचना :

  शरीर : या म्हशीची शरीर रचना सहज ओळखू येणारी असते. या म्हशींचे शरीर लांब अरुंद असते. तर म्हशींचा चेहरा मध्यम आकाराचा असतो. या म्हशींची शिंगे ही तलवारीसारखी लांब असतात. खांद्यापर्यंत वाढलेली असतात. तर यांची मान हे लांब आणि पातळ असते. या म्हशींचे वजन ४१६ किलो असते तर उंची १३० सें.मी. असते. या म्हशींची दूध देण्याची क्षमता ही १४०० लिटरची आहे.

 

 

नागपुरी(बरारी, वरडी, एलिचपुरी, गौलँड) या वेगवेगळ्या नावानी प्रसिद्ध आहे :

मूळ - नागपूर, वर्धा  , पूर्णथाडी (अकोला जि.), एलिचपुरी (अमरावती जि. ) ,गौलानी (वर्धा जि.), नागपूर या भागात या म्हशी आढळून येतात.

शारीरिक रचना : या म्हशींची शिंगे  (५०-६५ सें.मी. लांब असतात. मागेच्या मागच्या बाजूला वळलेली असतात. साधरण खांद्यापर्यंत या म्हशींची शिंगे असतात. या म्हशींचा चेहरा हा लांब पातळ आणि शंकूच्या आकाराचे असतात. या म्हशींची शेपटीही इतर म्हशींच्या तुलनेने लहान असते. या जातीच्या म्हशींचे वजन ७३९ -१५०० किलो असते. तर उंची साधरण १४५ सें.मी. असते.

 


मराठवाडी:

मूळ- या जातीच्या म्हशी मुख्यत मराठवाडा, परभणी,परभणी, नांदेड, बीड, हिंगोली आणि लातूर या भागात आढळतात.

शारीरिकरचना : या म्हशींचा रंगा राखाडी काळा असतो. या म्हशींची शिंगे मध्यम लांबीची असतात. शिंगे मानेला  समांतर असतात. परंतु खांद्याच्या पलीकडे जात नाहीत. या म्हशींची शेपटी ही पायापर्यत लांब असते. तर उंची साधरण १४३ सेंमी असते. या जातीच्या म्हशींचे वजन ४०० किलो असते. या म्हशी साधरण १२३० ते १४३० लिटर दूध देऊ शकतात. 

Buffalo breeding buffalo rearing म्हशीपालन म्हशींच्या जाती
English Summary: Buffalo breeding is the best for dairy production; these buffalo rearing in state

कृषी पत्रकारितेसाठी आपला पाठिंबा दर्शवा

प्रिय वाचक, आमच्यात सामील झाल्याबद्दल धन्यवाद. आपल्यासारखे वाचक आमच्यासाठी कृषी पत्रकारितेसाठी प्रेरणा आहेत. कृषी पत्रकारितेला अधिक बळकट करण्यासाठी आणि ग्रामीण भारतातील कानाकोप in्यात शेतकरी आणि लोकांपर्यंत पोहोचण्यासाठी आम्हाला तुमचे समर्थन किंवा सहकार्य आवश्यक आहे. आपले प्रत्येक सहकार्य आमच्या भविष्यासाठी मोलाचे आहे.

आपण आम्हाला समर्थन करणे आवश्यक आहे (Contribute Now)

Share your comments

Krishi Jagran Marathi Magazine Subscription ऑनलाईन अंक मागणीसाठी

शासन निर्णय

CopyRight - 2021 Krishi Jagran Media Group. All Rights Reserved.