1. पशुसंवर्धन

'ह्या' विदेशी शेळींचे अशा पद्धत्तीने पालन करून तुम्हीही करू शकता तगडी कमाई! जाणुन घ्या सविस्तर

अजय वसंत शिंदे
अजय वसंत शिंदे
boar goat

boar goat

भारतात जेव्हापासून शेती करण्यास मानवाने सुरवात केली त्या काळापासून मानव शेळीपालन व अन्य पशुचे पालन करत आला आहे. अल्पभूधारक शेतकरी तसेच भूमिहीन शेतकऱ्यांसाठी, शेतमजू्रांसाठी शेळीपालन एक उपजिवेकेचे प्रबळ साधन म्हणुन काम करत आहे. जसजसा मानव प्रगती करत आहे तसातसा शेतीच्या क्षेत्रात अमूलाग्र बदल आपल्याला पाहवयास मिळत आहे. शेळीपालनात देखील अमूलाग्र बदल घडत आहे

आता शेळीपालन केवळ उपजीविका भगवण्यासाठीच नव्हे तर आता शेळीपालन व्यवसायिकदृष्ट्या मोठ्या स्तरावर प्राथमिक व्यवसाय म्हणुन केले जात आहे. आणि शेतकरी बांधव ह्या शेळीपालणाच्या व्यवसायातून लाखों रुपयांची कमाई करत आहेत. असे असले तरी ग्रामीण भागातील अनेक शेतकरी व शेतमजूर वर्ग पाहिजे तसा शेळीपालनात यशस्वी होऊ शकला नाही ह्यांचे महत्वाचे कारण म्हणजे ह्या शेतकऱ्यांना शेळीच्या चांगल्या जातींची माहिती नाही आहे शिवाय शेळीपालन करण्याची शास्त्रीय पद्धत अवगत नाहीय. म्हणुन आज आम्ही आमच्या शेतकरी बांधवांसाठी एका विदेशी जातीच्या शेळीची माहिती घेऊन आलो आहोत. त्या शेळीचे नाव आहे बोअर शेळी. बोअरचे पालन भारतात बऱ्याच अंशी केले जाते पण तरी देखील ह्यांचे प्रमाण हवं तसे नाही आहे म्हणुन शेतकरी बांधव बोअर पालन करून चांगला नफा अर्जित करू शकतात. चला तर मग जाणुन घेऊया बोअर बकरीविषयी.

बोअर बकरीविषयी अल्पशी माहिती

बोअर ही शेळीची जात विशेषता तिच्या वजनासाठी ओळखली जाते ह्या बकरीचे वजन हे इतर शेळीच्या वजनापेक्षा अधिक असते.  बोअर शेळी ही विदेशात जास्त मोठ्या प्रमाणात पाळली जाते, विशेषत: दक्षिण आफ्रिका, ऑस्ट्रेलिया, न्यूझीलंड सारख्या देशांमध्ये, बोअर शेळी मोठ्या प्रमाणात पाळली जाते. भारतात देखील बोअर पालन मोठ्या प्रमाणात करायला सुरवात झाली आहे. बोअर शेळीच्या मांसाची वाढती मागणी पाहता ह्या शेळीचे पालन शेतकऱ्यांसाठी किफायतेशीर ठरू शकते. बोअर शेळ्या विशेषतः मांसासाठी पाळल्या जातात. बोअर शेळ्यांचे प्रजनन साधारणपणे ऑगस्ट ते डिसेंबर या महिन्यात होते. बोअर शेळ्यांमध्ये फक्त मध्यम आकाराच्या शेळ्यांना प्राधान्य दिले जाते. परदेशात या जातीची वाढती मागणी पाहता आपल्याकडील शेतकऱ्यांनीही या जातीमध्ये आपली आवड दर्शवली आहे. आणि शेतकरी आता बोअर पालन करू पाहत आहेत. भारतातही अलीकडच्या काळात बोअर पालन करणाऱ्यांच्या संख्येत लक्षणीय वाढ झाली आहे. भारतातील महाराष्ट्र, आंध्र प्रदेश, तेलंगणा, कर्नाटक आणि तामिळनाडू या राज्यांमध्ये बोअर पालन बऱ्याच अंशी यशस्वी होत आहे. प्रौढ नर बोअर शेळीचे वजन सुमारे 110 ते 155 किलो असते आणि जर आपण त्याच्या प्रौढ मादीचा विचार केला तर मादी शेळीचे वजन सुमारे 90 ते 110 किलो पर्यंत असते. बोअर शेळ्यांच्या मांसाची चव इतर शेळ्यांच्या मांसापेक्षा खूप चांगली असल्याचे सांगितले जाते म्हणुन बाजारात ह्याची मागणी मोठ्या प्रमाणात असते.

बोअर बकरीची शारीरिक जडण-घडण

»बोअर शेळीचा रंग हा साधारणपणे पांढरा असतो आणि मानेचा भाग हलका तपकिरी असतो, तर काही शेळ्या पूर्णपणे पांढऱ्या आणि पूर्णपणे तपकिरी रंगाच्या देखील असतात.

»बोअर शेळीचे कान हे इतर शेळीच्या तुलनेत लांब असतात.

»इतर शेळीच्या तुलनेत बोअर जास्त लवकर वाढते आणि तिचे वजन हे इतर शेलिंच्या तुलनेत अधिक असते त्यामुळे ह्यापासुन अधिक उत्पादन मिळते.

 

 बोअर बकरीचा खुराक नेमका काय?

शेतकरी बंधुनो चिंतेच काही कारण नाही बोअर आपल्या इतर बकरीसारखेच झाडाचा पाला-पाचोळा, कडधान्ये, गवत खाते. बोअर जातीच्या शेळीना सहसा झाडांची हिरवी पाने, मका, हिरवे गवत खाणे आवडते. बोअरचा आहार म्हणजेच खुराक हा इतर शेळींच्या तुलनेत अधिक असतो आणि त्यामुळे त्यांची वाढ आणि वजन देखील अधिक असते.

Like this article?

Hey! I am अजय वसंत शिंदे. Did you liked this article and have suggestions to improve this article? Mail me your suggestions and feedback.

Share your comments

आमच्या न्यूसलेटरचे सदस्य व्हा. शेती संबंधीत देशभरातील आताच्या बातम्या मेलवर वाचण्यासाठी आमच्या न्यूसलेटरची सदस्यता घ्या.

Subscribe Newsletters