ही जात मूळची ऑस्ट्रेलियाची असून हे तेथील स्थानिक जातीचा संकर आहे. ब्लॅक ओस्ट्रॉलोर्प कोंबडी म्हणजे उत्कृष्ट दुहेरी वापराची जात असून सध्या भारतात चांगल्या पद्धतीने संगोपिता केली जात आहे. तसेच ज्या जातीपासून अपेक्षेप्रमाणे उत्पादन देखील मिळते.दृष्ट वजन वाढ आणि अंडी उत्पादन यासाठी ही जात योग्य आहे.
ही जात कुठे मिळेल?
महाराष्ट्रात ही जात सर्वत्र उपलब्ध आहे. तसेच शासकीय आणि वैयक्तिक अंडी उबवणी केंद्रामध्ये उपलब्ध
या जातीला कसे ओळखावे?
ब्लॅक ओस्ट्रॉलोर्पया नावाप्रमाणेच काळा रंग पिसांवर निळसर हिरव्या रंगाची छटा अतिशय तजेलदार आणि चमकदार पीस असतात. डोक्यावर लालभडक एकेरी तुरा,चोचिखाली लालबुंद गलोल, पाय पातळ पिवळ्या तपकिरी किंवा काळा रंगाचे असतात. नरांमध्ये झुपकेदार शेपटी तसेच उंच आणि भारदस्त शरीर असते.
या जातीचे वजन वाढ
तीन महिन्यात या जातीचे एक ते दोन किलो वजन वाढते.
वयस्क नर दोन ते अडीच किलो
वयस्क मादी दीड ते दोन किलो
या जातीपासून मिळणारे अंडी उत्पादन
या जातीपासून मिळणारे अंडी उत्पादन हे पूर्णतः व्यवस्थापनावर अवलंबून आहे. तरीही सरासरी चार ते पाच अंडी प्रति आठवडा उत्पादन मिळू शकते.एकंदरीत अंडी मिळण्याच्या कालावधीत सरासरी 180 ते 220 अंडी उत्पादन मिळते. या जातीपासून मिळणारे अंडे हे मध्यम ते भारी वजनाचे असून अंड्याचे सरासरी वजन 45 ग्रॅम ते 50 ग्रॅम असते.अंड्यांचा रंग हा पांढरा किंवा गुलाबी पांढऱ्या किंवा भुऱ्या रंगाची अंडी असतात.
ओस्ट्रॉलोर्पही जात अतिशय चांगली रोग प्रतिकारक्षम असून कुठल्याही वातावरणात सहज टिकून राहते. योग्य लसीकरण आणि काळजी घेतल्यास बरसात किंवा बंदिस्त संगोपनासाठी अतिशय उपयुक्त आहे. या जातीच्या कोंबडीचे स्वभाव हा लाजाळू आणि मवाळअसल्यामुळे तिचे संगोपन आणि हाताळणी अतिशय सोपे असते. महिला, लहान मुले अगदी आरामात सांभाळू शकतात.
Share your comments