विविध कृषी विद्यापीठे आणि कृषी विज्ञान केंद्रे इत्यादींचा कृषी क्षेत्रातील विविध संशोधन आणि कामगिरी इत्यादींचा विचार केला तर खूप मोलाची भूमिका शेती क्षेत्रासाठी पार पाडताना दिसतात. मग ते शेती क्षेत्र असो की पशूपालन यामध्ये विविध प्रकारचे तंत्रज्ञान वापरून विविध प्रकारचे संशोधन सातत्याने कृषी विद्यापीठांच्या माध्यमातून केले जाते.
याच पार्श्वभूमीवर महाराष्ट्रातील प्रसिद्ध कृषी विद्यापीठ राहुरी येथील महात्मा फुले कृषी विद्यापीठाने देशी गाईंचे संवर्धन करता यावे यासाठी पुढाकार घेऊन संकरित गाईच्या पोटी सुदृढ आणि जास्त दूध देणाऱ्या गाईचा जन्म होणे आता शक्य होणार आहे.
याबाबतचे वृत्त असे की, राहुरी कृषी विद्यापीठामध्ये आता गिर गाईला जन्म देणारी संकरित गाय पहिली सरोगसी मदर ठरली आहे. हा अशा प्रकारचा हा राज्यातील पहिलाच प्रयोग असून हा यशस्वी सुद्धा करण्यात आला आहे.
नक्की वाचा:Goat Rearing: पाळाल 'या' दोन प्रजातीच्या शेळ्या तर नक्कीच मिळेल शेळीपालनात यश
राहुरी कृषी विद्यापीठाचा उपक्रम
यासाठी राहुरी कृषी विद्यापीठातील देशी गाय संशोधन प्रशिक्षण केंद्राने भ्रूण प्रत्यारोपण तंत्रज्ञानाचा वापर करून पहिल्यांदाच गीर जातीच्या कालवडींचा जन्म संकरित गायीच्या माध्यमातून केला आहे. तंत्रज्ञानाचा वापर करून पहिल्याच गीर जातीच्या कालवडींना जन्म संकरित गाईंच्या माध्यमातून राहुरी कृषी विद्यापीठातील गो संशोधन व विकास प्रकल्प या ठिकाणी झाला आहे.
राहुरी कृषी विद्यापीठात राबविण्यात येत असलेल्या या प्रकल्पाच्या माध्यमातून सुमारे 150 पेक्षा जास्त साहिवाल,राठी, थारपारकर, लाल सिंधी आणि गीर जातीच्या वासरांना जन्म दिला जाणार आहे.
Share your comments