शेतकऱ्यांसाठी मोठी बातमी! मधमाशी पालन करण्यासाठी केंद्र सरकार देते 'एवढं' अनुदान
शेतकरी मित्रांनो जर तुम्हालाही शेतीपूरक व्यवसाय सुरू करायचा असेल, तर आज आम्ही तुम्हाला अशा एक जोडव्यवसायाची कल्पना देत आहोत, जो व्यवसाय कमी गुंतवणूक करून देखील सुरू करता येईल. जर तुम्हालाही कमी गुंतवणुकीत शेतीसमवेतचं शेती पूरक व्यवसाय सुरू करायचा असेल तर आपण मधमाशी पालन हा व्यवसाय सुरू करू शकता आणि त्यातून भरपूर पैसे कमवू शकता.
मित्रांनो आम्ही आपल्या माहितीसाठी सांगू इच्छितो की, हा व्यवसाय सुरू करण्यासाठी केंद्र सरकारकडून सुद्धा आर्थिक मदत दिली जाते. हा व्यवसाय सुरू करण्यासाठी अनेक राज्यांकडून अनुदानही दिले जाते. या व्यवसायाची सर्वात मोठी विशेषता म्हणजे हा व्यवसाय गावात किंवा शहरात कुठेही सुरू करता येऊ शकतो. मधमाशी पालन आणि प्रक्रिया केंद्राच्या मदतीने मध प्रक्रिया युनिट उभारून मधमाशीपालनातून बंपर कमाई करता येऊ शकते.
कृषी आणि शेतकरी कल्याण मंत्रालयाने पीक उत्पादकता सुधारण्यासाठी मधमाशी पालन विकास नावाची केंद्रीय योजना सुरू केली आहे. मधमाशी पालनाचे क्षेत्र विकसित करणे, उत्पादकता वाढवणे, प्रशिक्षण देणे आणि जनजागृती करणे हा या योजनेचा उद्देश आहे. नॅशनल बी बोर्ड (NBB) ने नाबार्डच्या सहकार्याने भारतात मधमाशी पालनासाठी आर्थिक सहाय्याच्या योजनाही सुरू केल्या आहेत. हा व्यवसाय सुरू करण्यासाठी सरकार 80 ते 85 टक्के अनुदान देते.
35 हजारात सुरु करा हा व्यवसाय
जर तुमच्याकडे कमी भांडवल असेल तरी देखील तुम्ही हा व्यवसाय करू शकता. तुम्ही 10 पेट्या घेऊनही मधमाशी पालन व्यवसाय सुरू करू शकता. एका पेटीतुन 40 किलो मध मिळाले एकूण मध 400 किलो होईल. 350 रुपये प्रति किलो दराने 400 किलो विकल्यास 1.40 लाख रुपये मिळतील. जर प्रति पेटीची किंमत रु.3500 आली तर 35,000 रुपये आपणांस हा व्यवसाय सुरु करण्यासाठी खर्च करावे लागतील आणि निव्वळ नफा रु.1,05,000 मिळेल.
Share your comments