शेळीपालनातून मजूर वर्ग किंवा अल्पभूधारक शेतकऱ्यांना चांगला आर्थिक फायदा होत असतो. शेळीपालनातून दूध, मांस आणि खत मिळत असते. तीन्ही प्रकारातून आपण पैसा मिळवत असतो . शेळीपालन कमी खर्चात आणि कमी जागेत होत असते. या शेळीपालनात आम्ही तुम्हाला एका शेळीविषयी माहिती देत आहोत त्यातून तुम्ही अधिकचा नफा कमावू शकता. या शेळीचे नाव बीटल शेळी ही शेळी मांस आणि दुधासाठी फार उपयुक्त आहे.
शारीरिक संरचना
या शेळ्यांचा आकार हा फार वेगळा असतो. याच्या आकाराने या शेळ्या सहज ओळखता येतात. या शेळ्याचे पाय लांब असतात, कान खाली लांबलेले असतात. शेळ्याची शेपटी लहान असते, त्यांचे शिंग हे वळालेले असतात. या शेळ्या साधारण ८६ सेंमी पर्यंत लांब असतात. दूध क्षमता आता चर्चा करू याच्या दूध देण्याच्या क्षमतेविषयी. या शेळ्या दूध देण्यात सरस असून याची दूध देण्याची क्षमता ही साधारण २ ते अडीच लीटर दूध देत असतात. त्याच्या वेतात या शेळ्या १५० ते १९० लिटर दूध देऊ शकतात. या जातीच्या नर म्हणजे बोकड्याचे वजन साधरण ५० ते ६० किलो असते. तर शेळीचे वजन हे ३५ ते ४० किलो असते.
बीटर शेळ्यांचा आहार - या जातीच्या शेळ्यांना चारा आवडतो. सुका चारा आणि हिरवा चाराही या शेळ्यांना आवडत असतो. याशिवाय या शेळ्या आंबा, पिंपळ, अशोका, या वृक्षाची पानेही आवडीने खात असतात.
गाभन असलेल्या शेळ्याची देखरेख
गाभन शेळींची देखभाल व्यवस्थित केली पाहिजे. देखरेखीसाठी साधारण ६ ते ८ आठवड्यापुर्वीच दूध काढणे बंद करावे. यासह त्यांना स्वच्छ गोठ्यात बांधावे. शेळ्याच्या छोट्या पिल्लांचा जन्म झाल्यानंतर त्यांना व्यवस्थित स्वच्छ करावे. पिल्लांचा जन्म झाल्यानंतर ३० मिनीटानंतर खीस पाजावे. जर त्यांना श्वास घेण्यास त्रास होत असेल तर त्याचे मागील दोन्ही पाय पकडून डोके खाली करावे. त्याच्या लेव्यांना टिंचर आयोडिनने साफ करावे. या शेळ्यांना साधरणत : कोकसीडियोसिस नावाचा आजार होत असतो. विशेष करुन या शेळ्यांचे छोटे पिले या आजाराच्या विळख्यात पडत असतात. या आजारामुळे डायरिया, डीहायड्रेशन, वजन कमी होण्याची समस्या जाणवत असते.
Share your comments