पशुपालन व्यवसायामध्ये गाय आणि म्हशीसाठी पक्का गोठा असणे फार महत्त्वाचे असते.जर गोठा स्वच्छ तर जनावरे निरोगी राहतात.बऱ्याचदा गोठ्यामध्ये अस्वच्छता असते तसेच गोठ्याची जागा हीखाचखळगे आणिओबडधोबड असलेली असते.त्यामुळे बऱ्याचदा जनावरांना बसताना जखमा होऊन जनावरे आजारी पडतात.
.बऱ्याचदा अस्वच्छतेमुळेजनावरांना कासदाहहा जीवघेणा आजार होऊ शकतो. या ठिकाणी मौल्यवान मूत्र व शेणसाठविता न आल्याने वाया जाते. यासाठी या ठिकाणी चारा आणि खाद्यासाठी चांगली गव्हाण तसेच मुत्र संचयटाकी बांधण्यात येतील. यासाठी स्वतःची जमीन आणि इतर आवश्यक कागदपत्रे असलेले लाभार्थी यासाठी पात्र राहतील. यामध्ये एका गोठ्यासाठी 77 हजार 188 रुपये खर्च येईल.यासाठी सहा गुरांची पूर्वीची तरतूद रद्द करून दोन गुरेते सहा गुरे याकरिता एक गोठा व त्यानंतर आधी गुरांसाठी सहा च्या पटीत म्हणजे बारा गुरांसाठी दुप्पट आणि 18 गुरांसाठी तीन पट अनुदान देय राहील.
या योजने अंतर्गत मिळणारे अनुदान
- गाय व म्हैस यांच्याकरिता पक्का गोठा बांधणे: 77हजार 188 रुपये अनुदान मिळेल.
- शेळी पालन शेड बांधणे: 49 हजार 284 रुपये अनुदान मिळेल.
- कुकुट पालनासाठी शेड बांधणे: 49 हजार 760 रुपये अनुदान मिळेल.
- भू संजीवनी नाडेप कंपोस्टिंग: 10हजार 537 रुपये अनुदान मिळेल.
या योजनेसाठी लागणारे कागदपत्र
- लाभार्थ्याचे आधार कार्ड
- बँक पासबुक झेरॉक्स
- जातीचा दाखला
- पासपोर्ट साईज फोटो
- अर्जदार अपंग असल्याचा अपंगत्वाचा दाखला
- सातबारा उतारा
- 8अ उतारा
- भूमिहीन शेतकरी असल्यास ग्रामपंचायत नमुना क्रमांक 8
- रहिवासी प्रमाणपत्र
- लाभार्थ्यांनी निवडलेले काम हे लाभार्थी रहिवासी असलेल्या ग्रामपंचायतीमध्ये येत नसल्यास दोन्ही ग्रामपंचायत मध्ये ग्रामसभा नाहरकत ठरावाची प्रत
या योजनेसाठी अर्ज कुठे करावा?
आपल्या गावच्या ग्रामपंचायत मध्ये यांचा अर्ज करावा लागतो.यासाठी ग्रामपंचायत ग्रामसभा ठराव त्याचप्रमाणे वरील प्रमाणे कागदपत्रांची आवश्यकता राहील.
Share your comments