भारत हा कृषिप्रधान देश असून भारताची अर्थव्यवस्था कृषीवर आधारित आहे. भारतीय शेतकरी शेतीला जोडधंदा म्हणून पशुपालन व्यवसाय करतात.पशुपालन व्यवसायामध्ये शेळीपालन, मेंढी पालन यांना अनन्यसाधारण महत्त्व आहे. शेळी पालन अशोक के मेंढी पालन हे दोन्ही व्यवसाय कमी खर्चात व कमी जागेत करता येणारे असून कमी कालावधीत चांगला नफा देतात. यामध्ये मेंढी पालन हा व्यवसाय फार फायदेशीर असून योग्य व्यवस्थापन केल्यास या मधून चांगले उत्पादन मिळवता येऊ शकते.
मेंढ्यांच्या महत्त्वाच्या जाती
मुजफ्फरनगरी
- याजातीच्यामेंढ्यांचारंगहापांढराअसतो.
- या जातींच्या मेंढीच्या शरीरावर भुरक्या रंगाचे ठिपके असतात.
- मुजफ्फर नगरी जातीच्या मेंढ्या दिल्ली, उत्तर प्रदेश,मेरट आणि हरियाणा येथे आढळून येतात.
जालौनी
- या जातीचे नर आणि मादी दोघांनाशिंगेअसतात.
- या मेंढ्यांचे लोकर मऊ आणि जाड असते.
- या जातीच्या मेंढ्या झाँसी आणि ललितपुर मध्ये आढळतात.
पुंछी
- या जातीच्या मेंढ्या पांढऱ्या रगाच्या असून त्यांचा आकार छोटा असतो.
- या मेंढ्या गद्दी जात सारखे असतात.
- या जातीच्या मेंढ्या प्रामुख्याने जम्मू प्रांतातील पुंचआणि राजुरी येथे आढळून येतात.
मारवाडी
- या जातीच्या मेंढ्या चा आकार लहान असला तरी यांचे लोकर जड आणि दाट असते
- या जाती प्रामुख्याने राजस्थानमधील जोधपूर, पाली आणि जालोर येथे आढळून येतात.
- गद्दीमेंढी
- या जातीच्या मेंढ्या पासून आपल्याला वर्षातून तीन वेळा लोकरउत्पादनमिळतअसतं.
- ह्या जातीच्या मेंढ्या आकाराने मध्यम असून त्यांचा रंग काळा,पांढरा आणि लाल असतो.
- या जातीतील नरांना शिंगे असतात तर 10 ते 15 टक्के मादी मेंढी ना देखील शिंगेअसतात.
- या जातीच्या मेंढ्या कुल्लू,हिमाचल प्रदेश,उधमपुर आणि कांगडा प्रदेशात आढळून येतात.
( माहिती संदर्भ-kisanraaj.com)
Share your comments