1. पशुसंवर्धन

वराह पालनातून व्हा मालामाल; कमी वेळात अधिक मिळेल नफा

वरहा पालन

वरहा पालन

शेतकरी बांधवानो जरी तुम्ही शेतीसह दुसरा व्यवसाय करुन पैसे कमावण्याचा विचार करत असाल तर हा लेख तुमच्यासाठी महत्त्वाचा आहे. या लेखात आम्ही तुम्हाला वराह पालनाविषयी माहिती देणार आहोत. 

आधी वराहपालन फक्त काही विशिष्ट प्रवर्ग करत होता, पण त्यात ते कोणत्याच प्रकारचे शास्त्र पाळत नसल्याने त्यांना जास्त फायदा होत नव्हता. पण आता वराहपालन सर्वजण करत असून यात शास्त्ररित्या पद्धतीने हा व्यवसाय केल्याने अनेकजण मालामाल झाले आहेत.

कमी गुंतवणुकीत अधिक नफा  - वराहपालनाचा व्यवसाय हा फार नफा देणारा ठरत आहे. राष्ट्रीय वराह संशोधन केंद्रानुसार, तुम्ही साधरण ५० हजार रुपयांच्या गुंतवमणुकीत हा व्यवसाय करू शकतात.

उत्पन्न   - वराहाची वाढ लवकर होत असते. वराहाचे पिल्लू  साधरण ७ ते ८ महिन्यातच प्रजनन क्षमता धारण करत असते.

 

प्रजनन क्षमता - जर जाणकारांच्या मते एक मादी वराह ११४ते ११५ दिवसांमध्ये साधरण ६ ते ७ पिल्लांना जन्म देत असते. विशेष म्हणजे एका वराहपासून मांस मिळत असते. समजा वराहाचे वजन हे १०० किलोग्रॅम असेल तर त्यापासून ६० ते ७० किलो ग्रॅम मांस मिळत असते. जर तुम्ही वराहपालन करुन मांसची विक्री करत असाल तर तुम्ही अधिक नफ्यात राहू शकतात.

हेही वाचा : लम्पी आजारामुळे राज्यातील दूध उत्पादनाला फटका

वराहपालन करताना मात्र काही गोष्टींची काळजी घेण्याची आवश्यकता असते. ती म्हणजे वराहपाल जेथे करायची आहे ती जागा स्वच्छ असली पाहिजे. वर्दळ अधिक नसेल अशा ठिकाणी वराहपालनाचे शेड लावावे. जर तुम्ही हे शेड गावाकडे लावले तर तुम्हाला कमी पैश्यात शेडची जागा मिळेल शिवाय कामासाठी मजूरही कमी पैशात उपलब्ध होतील.

 

वराहची काही जाती 

लार्ज वाइट लार्कशायर

मिडल वाइट लार्कशायर

लँडरस

हँपशायर

स्वदेशी किस्म

एचएक्स 1

Like this article?

Hey! I am भरत भास्कर जाधव. Did you liked this article and have suggestions to improve this article? Mail me your suggestions and feedback.

Share your comments

आमच्या न्यूसलेटरचे सदस्य व्हा. शेती संबंधीत देशभरातील आताच्या बातम्या मेलवर वाचण्यासाठी आमच्या न्यूसलेटरची सदस्यता घ्या.

Subscribe Newsletters