द्विदल हिरव्या चाऱ्याची उपलब्धता हात दुग्ध व्यावसायिकांसाठी सतत भेडसावणारा ज्वलंत प्रश्न असतो.या समस्येवर रामबाण उपाय म्हणजे बरसीम घास लागवड होय.
बरसीम घास हे रब्बी हंगाम चार ते पाच कापण्या देणारे, अगदी कमी खर्चात अधिक चारा उत्पादन देणारे मेथी वर्गीय चारा पीक आहे. या चारा रुचकर, पालेदार तसेच लुसलुशीत, सकस व चविष्ट असतो व यामध्ये प्रथिनांचे प्रमाण जास्त असल्यामुळे दुभत्या जनावरांच्या प्रकृतीला चांगला मानवतो. या लेखामध्ये आपण बरसीम घास विषयी थोडक्यात जाणून घेऊ.
बरसीम घास लागवड
- मध्यम व भारी प्रतीची व पाण्याचा निचरा होणारी भुसभुशीत जमीन आवश्यक
- थंडीचा कालावधी जास्त महत्त्वाचा व या कालावधीत उत्पादन भरपूर मिळते व कापणी अधिक मिळतात.
सुधारित वाण
मेस्कावी आणि वरदान या दोन जाती बरसीम घास लागवडीसाठी उपयुक्त आहेत.
खतांचीमात्रा
लागवड करण्याआधी हेक्टरी 15 ते 20 गाड्या चांगले कुजलेले शेणखत पूर्वमशागतीच्या वेळी जमिनीत मिसळून घ्यावे. पेरणी करताना हेक्टरी 20 किलो नत्र,80 किलो स्फुरद आणि 40 किलो पालाश मिश्रण करून पेरणीपूर्वी द्यावे.
पेरणी पद्धत
पाच बाय तीन मीटर आकाराचे वाफे तयार करावेत व यामध्ये बियाणे फोकून द्यावे.पेरणी करण्यासाठी हेक्टरी 30 किलो बियाणे लागते.
पेरणीची वेळ
- ऑक्टोबरच्यातिसऱ्या आठवड्यापासून ते नोव्हेंबरच्या दुसऱ्या आठवड्यापर्यंत पेरणी करावी.
- पेरणी लवकर केली तर थंडी कमी असल्याने उगवण व्यवस्थित होत नाही. सुरवातीची वाढ जोमदार होत नाही.
- पेरणी उशिरा केली तर शेवटच्या कापणे मार्च-एप्रिल महिन्यात येतात. थंडीचे प्रमाण कमी झाल्याने उत्पादनावर विपरीत परिणाम होतो.
आंतर मशागत
- हे पीक तणांच्या चढाओढीस संवेदनशील असते. त्यामुळे योग्य वेळी आवश्यकतेनुसार एक किंवा दोन निंदण्या कराव्यात.
- पेरणी बियाणे फोकूनकेल्यास तन खुरपणी त्रासदायक व खर्चिक ठरते. म्हणून पेरणी शक्य तो 30 सेंटिमीटर अंतरावर मार्कर च्या साह्याने करावे. म्हणजे हात कोळपे द्वारे जवळ जवळ 75 टक्के तण नियंत्रण शक्य होते.
पाणीपुरवठा
रब्बी हंगामातील या पिकास जमिनीचा पोतनुसार दहा दिवसांच्या अंतराने पाण्याच्या पाळ्या द्याव्यात. कापणी पूर्वी चार ते पाच दिवस अगोदर पाण्याची पाळी येईल याप्रमाणे पाण्याचे नियोजन करावे. त्यामुळे हिरव्या चाऱ्याचे उत्पादन अधिक मिळते.
बरसिम चाऱ्याची कापणी
हिरव्या चाऱ्यासाठी बरसीम ची पहिली जावळ कापणी साधारण पेरणीनंतर 45 ते 50 दिवसांनी करावी. नंतरच्या कापण्या 21 ते 25 दिवसांच्या अंतराने कराव्यात. अशाप्रकारे ऑक्टोबर मध्ये पेरणी केल्यास बरसिम द्वारे चार ते पाच कापणे घेणे शक्य होते.
मिळणाऱ्या हिरव्या चाऱ्याचे उत्पादन
जर बरसीम पिकाचे योग्य व्यवस्थापन केले तर बरसीम पिकाचे चार ते पाच कापण्यात द्वारेहेक्टरी 600 ते 800 क्विंटल हिरव्या चाऱ्याचे उत्पादन मिळते
Share your comments