1. पशुसंवर्धन

पंजाब अन् राजस्थानमध्ये पाळली जाते १५० लिटर दूध देणारी शेळी

शेळीपालन व्यवसाय हा अधिक कमी भांडवलमध्ये केला जाणारा व्यवसाय. शेळीपालनातून मोठी आर्थिक कमाई होत असते. कमीत कमी माणसात शेळीपालन केले जाऊ शकते. शेळ्यांना आहारही कमी लागत असतो, यामुळे त्यांना गरिबांची गाय म्हटलं जातं. दरम्यान आज आपण अशाच एका शेळीविषयी जाणून घेणार आहोत जी उत्पादनासाठी मोठी प्रसिद्ध आहे. दूध उत्पादनासाठीच या शेळ्या पाळल्या जातात.

भारतात या शेळ्या अधिकत्तर पंजाब, राजस्थान, उत्तरप्रदेश या राज्यात पाळल्या जातात. या शेळ्या आकाराने मध्यम स्वरुपाच्या  असतात. कानांचा आकार हा छोटा असतो तर यांचे वजन हे २३ ते ४० किलो असते.  बारबरी शेळ्या विविध रंगाच्या असतात. या दूध देण्यात माहिर असून याची दुधाची क्षमता अधिक असते. या एका वेतात या शेळ्या १५० लिटर दूध देतात.  बारबरी शेळ्यांना काही विशेष आहाराची गरज नसते. कोणताही चारा या शेळ्या खाऊ शकतात. शेंगा असलेल्या भाज्या, लहसून खाण्यास या शेळ्यांना फार आवडते.

 

गाभन असलेल्या शेळ्यांची देखभाल कशी कराल

या शेळ्या खूप तंदुरुस्त असतात. परंतु गर्भ धारण जेव्हा करतात तेव्हा आपल्याला विशेष काळजी घ्यावी लागते.  गर्भ धारण करत असताना साधारण दीड महिन्याआधीच दूध काढणे बंद करावे. त्यांना स्वच्छ आणि सुरक्षित जागेत ठेवावे.  पिल्लांना जन्म दिल्यानंतर शेळीचा मागील भाग आयोडीन किंवा निंबाच्या पाण्याने साफ करावा. शेळ्यांना साखर मिसळलेले गरम पाणी पिण्यास द्यावे.

Share your comments

आमच्या न्यूसलेटरचे सदस्य व्हा. शेती संबंधीत देशभरातील आताच्या बातम्या मेलवर वाचण्यासाठी आमच्या न्यूसलेटरची सदस्यता घ्या.

Subscribe Newsletters