1. पशुधन

शेतकऱ्यांना ही बँक काहीही गहाण न ठेवता देतेय कर्ज, दुग्ध व्यवसाय करणाऱ्यांना सुवर्णसंधी..

सध्या दुग्ध वुवसाय करणाऱ्या शेतकऱ्यांना चांगले दिवस आहे आहेत. देशातील डेअरी उद्योगाला चालना देण्यासाठी सरकार शेतकऱ्यांना बंपर सबसिडी देत ​​आहे. यासोबतच शेतकऱ्यांना कमी व्याजदरात कर्जही उपलब्ध करून दिले जात आहे. जर तुम्हाला दुग्ध व्यवसाय सुरू करायचा असेल तर तुम्ही सहज कर्ज घेऊ शकता. यामुळे अनेकजण याकडे वळाले आहेत.

निंबाळकर ओंकार रमेश
निंबाळकर ओंकार रमेश
dairy farmers loan

dairy farmers loan

सध्या दुग्ध व्यवसाय करणाऱ्या शेतकऱ्यांना चांगले दिवस आहे आहेत. देशातील डेअरी उद्योगाला चालना देण्यासाठी सरकार शेतकऱ्यांना बंपर सबसिडी देत ​​आहे. यासोबतच शेतकऱ्यांना कमी व्याजदरात कर्जही उपलब्ध करून दिले जात आहे. जर तुम्हाला दुग्ध व्यवसाय सुरू करायचा असेल तर तुम्ही सहज कर्ज घेऊ शकता. यामुळे अनेकजण याकडे वळाले आहेत.

आता स्टेट बँक ऑफ इंडिया (SBI) शेतकऱ्यांना दुग्ध व्यवसाय सुरू करण्यासाठी कर्ज देत आहे. विशेष म्हणजे हे कर्ज दुग्धव्यवसायाशी संबंधित अनेक श्रेणींमध्ये दिले जात आहे. दुग्धउद्योजकता विकास योजनेंतर्गत सरकार शेतकऱ्यांना दुग्ध व्यवसाय सुरू करण्यासाठी २५ टक्के अनुदानही देत ​​आहे. तुम्ही आरक्षित कोट्यातून असाल तर तुम्हाला ३३% सबसिडी मिळेल.

यासाठी तुम्हाला 10 जनावरांपासून हा व्यवसाय सुरू करावा लागेल. बांधकाम, दूध संकलन प्रणाली, स्वयंचलित दूध मशीन आणि दुग्धव्यवसाय चालविण्यासाठी वाहतूक यासाठी कर्ज देत आहे. या कर्जाचा व्याज दर 10.85% पासून सुरू होतो, जो कमाल 24% पर्यंत पोहोचू शकतो. यामुळे हे फायदेशीर आहे.

आता साखर कारखान्यांमधील अंतर 25 किमी वरून 15 किमीवर येणार, मुख्यमंत्र्यांची मोठी घोषणा

तसेच दूध संकलन प्रणाली मशीन खरेदी करण्यासाठी तुम्ही एक लाख रुपयांपर्यंत कर्ज घेऊ शकता. त्याच वेळी, बँक तुम्हाला इमारत बांधकामासाठी 2 लाख रुपयांपर्यंतचे कर्ज देऊ शकते. वाहतुकीच्या नावाखाली वाहन खरेदी करण्यासाठी जास्तीत जास्त तीन लाख रुपयांचे कर्ज घेता येईल. यामुळे शेतकऱ्यांना आपला व्यवसाय सुरु करता येईल.

कांद्याच्या विक्रीसाठी 420 किलोमीटर प्रवास, कांद्याची पट्टी आली फक्त 8 रुपये

दरम्यान, कर्ज देण्यासाठी बँक शेतकऱ्यांची कोणतीही मालमत्ता गहाण ठेवत नाही. यामुळे शेतकऱ्यांना हे कर्ज सहज उपलब्ध होणार आहे. सध्या दुग्ध व्यवसाय करणाऱ्या शेतकऱ्यांना चार पैसे मिळू लागले आहेत. यामुळे सध्या याकडे मोठ्या प्रमाणावर शेतकरी वळाले आहेत.

महत्वाच्या बातम्या;
एका महिन्यात FRP चे पैसे मिळायला हवे, अन्यथा साखर कारखान्यांवर कारवाई, सहकार मंत्र्यांची माहिती
एका महिन्याच्या आत शेतकऱ्यांना FRP चे पैसे मिळायला हवे, अन्यथा साखर कारखान्यांवर कारवाई
सोयाबीन उत्पादक शेतकऱ्यांचा आक्रोश! स्वाभिमानीकडून संत्र फेकून सरकारचा निषेध

English Summary: bank giving loans without mortgage, opportunity dairy farmers.. Published on: 01 December 2022, 04:27 IST

Like this article?

Hey! I am निंबाळकर ओंकार रमेश. Did you liked this article and have suggestions to improve this article? Mail me your suggestions and feedback.

Share your comments

आमच्या न्यूसलेटरचे सदस्य व्हा. शेती संबंधीत देशभरातील आताच्या बातम्या मेलवर वाचण्यासाठी आमच्या न्यूसलेटरची सदस्यता घ्या.

Subscribe Newsletters