फायदेशीर दुग्ध व्यवसायासाठी जनावरे सुदृढ आणि प्रजननक्षम असणे आवश्यक आहे. विविध कारणांमुळे जनावरांमध्ये वंध्यत्व येतेकिंवा वांजपणा आढळून येतो. त्यामुळे गोठ्यातील प्रजनन व्यवस्थाच कोलमडून जाते. त्यामुळे वंध्यत्व निवारणासाठी योग्य प्रजनन व्यवस्थापन या सोबतच कृत्रिम रेतन कडेलक्ष देणे आवश्यक आहे.या लेखात आपण कृत्रिम रेतनाचे फायदे याबद्दल जाणून घेणार आहोत.
कृत्रिम रेतनाचे फायदे
- वंध्यत्वावर एकमेव उपाय म्हणजे कृत्रिम रेतन होय. कृत्रिम रेतनने काही प्रकारच्या वंध्यत्वावर नियंत्रण मिळवता येते.
- जातिवंत व सिद्ध वळूचे वीर्य वापरता येते.
- कृत्रिम रेतनासाठी वापरल्या जाणाऱ्या वळूची शुद्धता वीर्य साठवण्याचे अगोदरच तपासली जाते. वंश उत्पादन क्षमता यावर मुख्य लक्ष असते.
- जनावरे विविध प्रकारच्या संसर्गजन्य रोगाला बळी पडत नाही. रोगांचा होणारा संसर्ग टाळता येतो.
- बऱ्याच वेळा नैसर्गिक रेतनाचा काळा जनावराच्या माजा नुसार नसतो. त्यामुळे जनावरांमध्ये वंध्यत्व येते. कृत्रिम रेतन यामध्ये माझा चे उत्तम परीक्षण करून रेतनाची क्रिया केली जाते.
- पशुपालकाला गोठ्यात वळूचे संगोपन करण्याची गरज पडत नाही. त्यामुळे वाळूच्या संगोपनावर व देखभालीवर होणारा खर्च कमी होतो.
- वंध्यत्व मध्ये बऱ्याच वेळा असे दिसून येते की, जनावरांचे शारीरिक वजन कमी असल्यास सूक्ष्म जंतूंचा प्रादुर्भाव हा जास्त प्रमाणात असते. अशा परिस्थितीमध्ये जनावराला उत्तम प्रतीच्या जंतु नाशकाचा योग्य प्रमाणात वापर करून रोजच्या आहारात मिश्र खनिज द्रव्याचा वापर करावा.
- पैदाशीच्या वळूपासून एकावेळी गोळा केलेल्या वीर्यापासून किमान दोनशे ते सातशे वीर्य कांड्या तयार होतात.त्यामुळे उच्च गुणवत्तेच्या वळूची उत्पादकता वाढवता येते.
- जनावरांच्या मूळ जाती नामशेष होण्याच्या मार्गावर आहेत, अशाच जनावरांमध्ये सिद्ध वळूचे वीर्य वापरुन त्या जनावरांच्या जातींचे संवर्धन करून दूध उत्पादन क्षमता वाढविता येते.
- नैसर्गिक फलनासाठी वळू व मादी चे वजन व शारीरिक आकारमान समान असणे गरजेचे असते. पण कृत्रिम रेतन मध्ये ही अडचण येत नाही.
- कृत्रिम रेतन यामुळे नोंदी ठेवून प्रजननाची योग्य व्यवस्थापन साधता येते.
- जास्त वयाचा आणि जखमी वळूंचा ही रेतना साठी वापर करता येतो.
Share your comments