पशुपालनात आपल्याला यश हवे असेल तर जनावरांकडे लक्ष देणं आवश्यक असते. बदलत्या हवामानानुसार जनावरांना आजार होत असतात. यापासून वाचण्यासाठी वेळेवर लसीकरण करणं आवश्यक असतं. जनावरातील औषधपचारापेक्षा लसीकरणाचा खर्च कमी आहे. यासाठी जनावरांतील रोगप्रतिबंधक उपाययोजना कराव्यात.
जनावरांचे व्यवस्थापन आरोग्य झाल्यास त्यांच्या शरीरात ताण वाढून त्यांच्या रोग प्रतिकारक शक्तीत घट होते. जनावरांच्या शरीरावर ताम वाढू नये म्हणून यांना संतुलित आहार द्यावा. निवारा सर्व ऋतूत आरामदायक असावा. गोचीड, माश्या इत्यादी पाासून मुक्तता असावी. जनावरांचे शरीर, गोठा आणि त्यांच्या संपर्कात येणाऱ्या व्यक्ती इत्यादीच्या बाबतीत सर्वांगीण स्वच्छता आवश्यक आहे. जनावरांच्या पोटात वेगवेगळे जंत होतात. जनावरांच्या शरीरावर गोचीड, गोमाशा, पिसवा, यासरखे कीटक वाढतात, हे परोपजीवी असून ते पशुंच्या शरीरातील रक्त, अन्न रस शोषण करतात.
रोग प्रतिकारक शक्तीत वाढ करण्याचे उपाय
-
संसर्गजन्य रोगांपासून संरक्षण करण्यासाठी उपलब्ध रोगांच्या लसी जनावरांना नियमितपणे टोचून घ्याव्यात. त्यामुळे जनावरांच्या रोगप्रतिकारक शक्तीत वाढ होते.
-
एखाद्या रोगासाठीची लस जनावरांना टोचल्यानंतर पुढील 21 दिवसांच्या कालावधीत त्या रोगासाठीची प्रतिकारक शक्ती शरीरात तयार होते.
रोगासाठी तपासण्या
जनावरांना होणारे ठराविक रोग, जनावरांसाठी व मानवासाठी घातक आहेत. जनावरांना अशी रोग झाल्यास पशुंना कळपातून बाहेर काढून टाकावे.
लसीकरण
-
लसीकरण हे फक्त निरोगी जनावरांना करावे. आजारी जनावरांना लस टोचू नये.
-
कळपातील किंवा गोठ्यातील सर्व जनावरांना लस एकाच वेळी टोचवी.
-
कोणत्याही दोन वेगवेगळ्या लसी टोचण्यामध्ये कमीत कमी 21 दिवसांचे अंतर असावे.
-
लसीकरम करण्यापूर्वी जनावरांना जंतनाशक दिलेल असावे. लसीकरण हे सकाळी किंवा संध्याकाळी थंड वातावरण करावे.
-
लसीकरम टोचण्याची सुई प्रत्येक जनावरांसाठी निर्जंतुक केलेली असावी. लस टोचण्यासाठी योग्य पद्धत वापरावी.
-
लस थंड अवस्थेत राहणे आवश्यक असते, त्यासाठी ती थर्मासमध्ये किंवा बर्फात ठेवून टोचावी. काही जनावरांना लस टोचल्यानंतर त्या ठिकाणी सूज येणे, ताप येणे, दूध उत्पादनात घट येणे स्वाभाविक आहे.
Share your comments