
lumpy disease
सध्या लम्पीरोगामुळे राज्यातील शेतकरी अडचणीत आला आहे. आता लम्पीचा वाढता प्रादुर्भाव पाहता पालघर जिल्हा प्रशासन अलर्ट मोडमध्ये आहे. गुजरातसह उत्तरेकडून येणाऱ्या राज्यांतील जनावरांना महाराष्ट्रात येण्यास बंदी घालण्यात आली आहे. पालघर जिल्हा पशुसंवर्धन विभागाने हा निर्णय़ घेतला आहे. महाराष्ट्र सीमेवर नाके उभारून जनावरांची बारकाईने तपासणी करण्यात येणार आहे.
गेल्या काही दिवसांपासून देशासह राज्यात मोठ्या प्रमाणावर लम्पीचे रोगाने थैमान घातले आहे. यामुळे अनेक जनावरे दगावली आहेत. lumpy disease देशात २ वर्षांपूर्वी कोरोना महामारीने थैमान घातले होते. यामध्ये लाखो लोकांचे जीव गेले. मात्र माणसाबरोबर जनावरांनाही (Animal) साथीचा रोग (Epidemic disease) आला आहे. यामध्ये जनावरे मरण्याची संख्या वाढत आहे.
लम्पी रोगाने देशातील पशुपालकांची Cattle breeder) चिंता वाढवली आहे. दरम्यान, महाराष्ट्रात लम्पी आजाराचा फैलाव झपाट्याने होतोय. आता तर थेट कृषीमंत्र्यांच्या मतदार संघातूनच धक्कादायक बातमी हाती आली आहे. कृषीमंत्री अब्दुल सत्तार यांच्या सिल्लोड तालुक्यातील एका गावात तब्बल 10 जनावर लम्पी आजारानं दगावली आहे.
द्राक्ष आणि डाळिंब पीक परिसंवादाचे आयोजन, शेतकऱ्यांना मोलाचे मार्गदर्शन..
यामुळे कृषीमंत्र्यांच्या तालुक्यात अशी परिस्थिती असेल तर इतर ठिकाणी भयानक परिस्थिती असणार आहे. दरम्यान, उंडणगावमधील ही घटना आहे. गावातील अनेक जनावरांना या आजाराची लागण झाली असून त्यात 10 जनावरांचा मृत्यू झाला आहे. यामुळे येथील शेतकऱ्यांमध्ये चिंतेचं वातावरण आहे. महाराष्ट्रातील 22 जिल्ह्यांतील 396 गावांमध्ये लम्पीचा प्रसार झाला आहे.
यामुळे आता प्रशासन सतर्क झाले आहे. यामुळे जनावरांचे बाजार बंद करण्यात आले आहेत. राज्याचे पशुसंवर्धन आणि दुग्ध विकास मंत्री राधाकृष्ण विखे पाटील यांनी अशा तातडीच्या सूचना केल्या आहेत. यामध्ये हजारो जनावरांचा मृत्यू झाला आहे तर ११ लाखांहून अधिक संक्रमित जनावरे समोर आली आहेत.
असे असताना आता जनावरांमधील लंपी या साथीच्या रोगाला आळा घालण्यासाठी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी एक मोठी घोषणा केली आहे. भारतामधील शास्त्रज्ञांनी लम्पी रोगावर लस तयार केली आहे. या लसीकरणाबरोबरच तपासणी चाचण्यांना वेग देऊन जनावरांच्या हालचालीवर लक्ष ठेऊन हा आजार अटोक्यात आणला जाईल, असे त्यांनी म्हटले आहे.
महत्वाच्या बातम्या;
Farmar loan: कर्ज फेडणाऱ्या ४९ हजार शेतकऱ्यांना लाभ, शेतकऱ्यांना दिलासा
मोबाईलने जमीन किंवा शेत कसे मोजायचे? वाचा साधी आणि सोप्पी पद्धत..
भीमाशंकर साखर कारखान्यास देशातील सर्वोत्कृष्ट पुरस्कार जाहीर
Share your comments