1. पशुधन

गाय आणि म्हैसखरेदी- विक्री साठी उपयुक्त आहे हे संकेतस्थळ, जाणून घेऊ माहिती त्याबद्दल

आता बरेच बदल झाले असून बऱ्याच गोष्टी ऑनलाईन पद्धतीने केले जात आहेत. मग त्यामध्ये एखादे प्रॉडक्ट, शेतीमाल देखील ऑनलाईन विकला जातो. त्याच पार्श्वभूमीवर आता गाय,म्हैस आणि बैलाची ऑनलाईन विकली जाऊ लागले आहेत.

पाटील रत्नाकर अशोक
पाटील रत्नाकर अशोक
buffalo

buffalo

आता बरेच बदल झाले असून बऱ्याच गोष्टी ऑनलाईन पद्धतीने केले जात आहेत. मग त्यामध्ये एखादे प्रॉडक्ट, शेतीमाल देखील ऑनलाईन विकला जातो. त्याच पार्श्वभूमीवर आता गाय,म्हैस आणि बैलाची ऑनलाईन विकली जाऊ लागले आहेत.

या ऑनलाईन प्लॅटफॉर्मवरून त्यांची विक्री आणि खरेदी देखील करता येते. या प्लॅटफॉर्मवर गाई आणि म्हशीची किंमत ही साधारणपणे तिचे किती वेतआहे आणि ती किती लिटर दूध देते यावरून ठरते.

 सर्वसाधारणपणे गाय आणि म्हशी ची किंमत किती? सर्वसाधारणपणे गाय आणि मशीनची किंमत ही त्यांच्या दुधावर आणि  वेतावर अवलंबून आहे. यावरून साधारणपणे दहा लिटर दूध देणारी गाय जवळपास 65 ते 80 हजार रुपयांना विकली जाते. वेता नुसार ही किंमत कमी जास्त होऊ शकते. जास्त वेत झालेल्या म्हशीना किंमत कमी मिळते.

जनावरांच्या  विक्रीसाठी खास संकेतस्थळ

जनावरांच्या विक्रीसाठीanimal.in या वेबसाईटची सुरुवात करण्यात आली आहे. या वेबसाइटवर सर्व जातींच्या गाई व म्हशीची माहिती तुम्हाला मिळेल. त्याच बरोबर या वेबसाइटवर तुम्ही जनावरांची खरेदी-विक्री देखील करू शकता.

 या संकेतस्थळावर असणार्‍या सुविधा

animall.in या संकेतस्थळावर तुम्ही जनावरांची खरेदी-विक्री देखील करू शकतात त्याचबरोबर पशुवैद्यकिय डॉक्टरांशी सल्लामसलत करू शकता. या वेबसाईटवर आणि कॉन्टॅस्टठेवण्यात आलेले असतात त्यामध्ये भाग घेऊन तुम्ही पैसे मिळवू शकता.यासह  वेबसाईटवर दुधाचा हिशोब ठेवणे, गाय म्हशीची किंमत माहिती करून घेणे व डॉक्टरांशी बोलण्याचे सुविधाही देण्यात आली आहे.

 ज्या पद्धतीने कशी होते खरेदी विक्री?

 या वेबसाइटवर तुम्ही गाय, म्हैस, वासरू, बैल इत्यादी जनावरांची खरेदी-विक्री करू शकता. ही जनावरे तुम्ही अनेक फिल्टर्सलावून खरेदी करता येऊ शकतात.

त्याचबरोबर दूध देण्याची क्षमता,अनेक  जातींच्या गाय व म्हशचीपडताळणीकरून तुम्ही जनावर  विकत घेऊ शकता. जनावरांच्या मालकाची माहितीही या वेबसाइटवर असते. तुम्हाला तुमच्याकडे जनावरांची विक्री करायची असेल तर त्यांचे सर्व माहिती तुम्हाला द्यावे लागेल. त्यासाठी तुमच्याकडील गाय, म्हशीचा फोटो आणि त्याबाबत सविस्तर माहिती द्यावी लागेल. हे सर्व करत असताना तुम्हाला संबंधित संकेतस्थळावर तुमचा अकाउंट ओपन करावे लागते.

( संदर्भ-tv9 मराठी)

English Summary: animal.in is benificial website for the buying and purchasing to cow and buffalo Published on: 14 December 2021, 01:29 IST

Like this article?

Hey! I am पाटील रत्नाकर अशोक. Did you liked this article and have suggestions to improve this article? Mail me your suggestions and feedback.

Share your comments

आमच्या न्यूसलेटरचे सदस्य व्हा. शेती संबंधीत देशभरातील आताच्या बातम्या मेलवर वाचण्यासाठी आमच्या न्यूसलेटरची सदस्यता घ्या.

Subscribe Newsletters