पावसाळ्यात जनावरांसाठी हिरवा चारा मोठ्या प्रमाणात उपलब्ध होतो, त्यामुळे चाऱ्याची उत्तम सोय होत असते. मात्र कित्येकदा जनावरांकडून असा पाला किंवा वनस्पती खाल्ल्या जातात ज्यातून त्यांच्या जीवाला धोका असतो. अनेकदा विषबाधा (poisoning) होते त्यामुळे या चाऱ्याविषयी जाणून घेऊया...
विषारी वनस्पती उदा. निळी फुली व माठ/काटेमाठ या आहेत. या वनस्पती पशुधनाच्या खाण्यामध्ये आल्यास विषबाधा होते. माठ/काटेमाठ खाण्यात आल्यास त्यातील नायट्रेटची विषबाधा होऊन श्वसन संस्थेवर परिणाम होऊन जनावरांवर मृत्यू ओढवण्याची शक्यता असते.
महत्वाचे म्हणजे निळीफुली ही वनस्पती (plant) खालल्यास किडणीवर परिणाम होतो म्हणून अशा वनस्पती खाण्यात येणार नाहीत याची पशूपालकांनी दक्षता घ्यावी, व खाण्यामध्ये आल्यास तात्काळ औषधोपचार करण्याची गराह पडेल.
हे ही वाचा
Bater Rearing: अरे वा! अवघ्या 35 दिवसात मोठी कमाई; शेतकरी मित्रांनो 'या' लहान पक्षांचे करा पालन
पावसाळ्यात जनावरांना घटसर्पचा धोका
पावसाळयामध्ये पशुधनामध्ये घटसर्प (Ghatasarp) हा विषाणूजन्य आजार एक घातक रोग आहे. या रोगामधील फुफुसाचा दाह (न्यूमोनिया) हा प्रकार जिवघेणा ठरतो. जनावरे अचानक आजारी पडणे, नाकावाटे श्वास घेण्यास त्रास होणे ही लक्षणे प्रामूख्याने आढळतात. त्यामुळे वेळीच उपचार करण्याची गरज असते.
हे ही वाचा
Horoscope: 'या' राशीच्या लोकांसाठी आज धनलाभाचा योग; जाणून घ्या...
पावसाळ्यात जनावरांची अशी काळजी घ्या
1) पावसाळयामध्ये शक्यतो शेळ्या मेंढ्यांना उघडयावर ठेवण्याऐवजी शेडमध्ये बांधावे त्यामूळे त्यांना पावसाचा मार बसणार नाही. भिजल्यामुळे शेळ्या-मेंढ्यांना फुफ्फूसाचा दाह होण्याची शक्यता असते (थंड पाण्याच्या मारामूळे) तसेच दलदल जमीनीमूळे खूर सडण्याची समस्या उद्भवणार नाही.
2) तसेच निवा-याच्या ठिकाणी बांधावे व पावसात भिजणार नाहीत याची काळजी घ्यावी. पशूधनास खुले पाणी, तलाव किंवा नदीपासून दूर ठेवावे, ट्रक्टर आणि इतर धातूंच्या शेती अवजारांपासून दूर ठेवावे व पशुधनास झाडाखाली जमा होऊ देऊ नये.
महत्वाच्या बातम्या
Rain Condition: मान्सूनच्या दुसऱ्या टप्प्यातील पाऊस खरीप पिकांसाठी फायद्याचा ठरेल का? जाणून घ्या
50 Thousand: शेतीमध्ये चांगले उत्पादन घ्या आणि 50 हजार रुपये जिंका; जाणून घ्या पिकस्पर्धा योजनेबद्दल
Electric Car: काय सांगता! एका चार्जमध्ये जास्त रेंज देतेय 'ही' इलेक्ट्रिक कार; जाणून घ्या 'या' कारबद्दल
Share your comments