गाई-बैल आजारी… आणि शेतकऱ्याचं मन तडफडतंय!
गाईचा डोळा लालसर झालाय, अंगावर फोड उठलेत, ती शांत आहे…न खाणारी, न रमत-गमत फिरणारी…
ही आपली गाय! जी आपल्याला रोज दूध देते, आपल्या घराचा कणा आहे- तीच आता लंपी त्वचारोगामुळे विवश झाली आहे…माणूस आजारी असला तरी बोलू शकतो… पण जनावरं फक्त सहन करतात!
त्या गाठी, सूज, ताप- सगळं मुक्यानं सोसतात…
आणि आपल्याला फक्त त्यांचे डोळे विचारताना दिसतात –
“माझ्यावर इलाज कराल ना…?”
लंपी त्वचारोग- थोडं दुर्लक्ष आणि मोठं नुकसान!
हा विषाणूजन्य आजार एका जनावरातून दुसऱ्यावर डास, माशा किंवा थेट संपर्कातून पसरतो.
बाधित जनावरांना वेळेवर उपचार मिळाले नाहीत तर-
✅ दूध उत्पादन थांबतं.
✅ जनावर मरूही शकतं.
✅ इतर जनावरंही संक्रमित होतात.
✅ सावधगिरीचं कवच घाला!
अशी घ्या काळजी...
जनावराच्या अंगावर गाठी दिसताच त्वरित डॉक्टरांना दाखवा.
स्वच्छता ठेवा, डासांपासून संरक्षण करा.
बाधित जनावरांना इतरांपासून वेगळं ठेवा.
शासकीय लसीकरण मोहीमेचा लाभ घ्या.
गोठा, पाणी, आणि उपकरणं स्वच्छ ठेवा.
ती जनावरं फक्त तुमच्यावर विश्वास ठेवतात…
त्यांच्या डोळ्यांत माया आहे, आपल्या पोटासाठी त्यांचं आयुष्य वेचत असतात…
त्या आजारी पडल्या की फक्त शरीर नव्हे, शेतकऱ्याचं मनही कोसळतं! म्हणून, वेळेत पाऊल उचला…
गाईचं रक्षण म्हणजे आपलं भाग्य जपणं आहे!
लेखक-
नितीन रा. पिसाळ
पशुसंवर्धन सल्लागार व कृषी अभ्यासक
फार्मर द जर्नलिस्ट- कृषी जागरण
Share your comments