शेतकरी बंधुनो, चाटण विटा (Mineral Lick Blocks) जनावरांच्या पोषणासाठी महत्वाच्या असतात. पण चुकीची विट खरेदी केली तर आरोग्याचा आणि पैशाचा दोन्ही तोटा होऊ शकतो. म्हणूनच खरेदी करताना हे लक्षात ठेवा:
- ब्रँड व कंपनीचा दर्जा पाहा – ISO, BIS प्रमाणित उत्पादकांची निवड करा.
- साहित्य तपासा – कॅल्शियम, फॉस्फरस, मिठ, झिंक, कॉपर, सेलेनियम यांचे प्रमाण योग्य आहे का ते पहा.
- जनावरांच्या वयोगटानुसार निवड – वासरं, दुधाळ जनावरे, गाभण जनावरे यांच्यासाठी वेगवेगळ्या विटा उपलब्ध आहेत.
- आकर्षक रंगांवर न जाऊन गुणवत्ता पहा – काही विटा रासायनिक रंगांनी रंगवल्या जातात.
- सेंद्रीय (Organic) की रासायनिक? – शक्यतो सेंद्रिय पर्याय निवडा.
- पॅकिंग व लेबलिंग तपासा – उत्पादनाची तारीख, एक्सपायरी डेट आणि साहित्याची यादी पहा.
- किंमत आणि वजनाचा तुलनात्मक विचार करा – जास्त वजन आणि योग्य किंमत असलेली विट घेणे फायद्याचं.
- पशुवैद्यकांचा सल्ला घ्या – जनावरांच्या स्थितीनुसार कोणती विट योग्य आहे हे जाणून घ्या.
- स्थानिक हवामान विचारात घ्या – काही ठिकाणी विशिष्ट खनिजांची कमतरता जास्त असते.
- ओलसरपणा टाळा – विटा कोरड्या ठिकाणी ठेवलेल्या असतील याची खात्री करा.
- जनावरांची आवड तपासा – काही जनावरे विशिष्ट प्रकारच्या चव असलेल्या विटा जास्त चाटतात.
- डुप्लिकेट प्रोडक्टपासून सावध रहा – फसवे ब्रँड्स टाळा आणि नेहमी अधिकृत विक्रेत्याकडून खरेदी करा.
“योग्य चाटण विट = निरोगी जनावरे + जास्त दूध उत्पादन”
लेखक- नितीन रा. पिसाळ
पशुसंवर्धन सल्लागार व कृषी अभ्यासक
फार्मर द जर्नलिस्ट- कृषी जागरण (राष्ट्रीय कृषी मीडिया)
Share your comments