जनावरांमध्ये खुरांचे संसर्गजन्य आजार प्रामुख्याने आढळतात.या आजारांचा परिणाम जनावरांच्या दूध उत्पादनावर होतो.गोठ्यातील अस्वच्छता, दलदल आणि खडबडीत पृष्ठभाग या गोष्टी खुरांच्या आजारास कारणीभूत ठरतात.
उपाययोजना
- जनावरांचे खूर कोरडे आणि स्वच्छ ठेवणे अत्यंत महत्त्वाचे आहे.
2) गोठ्यातील मल-मूत्र वेळच्या वेळी साफ करावे. गोठ्यात पाणी साठू देऊ नये. सांडपाण्याची नीट व्यवस्था करावी.
3) गोठ्यामध्ये जाड थराचे भुश्शाचे बेडिंग तयार केले असता जनावरांच्या पायाचा संबंध शेण-मूत्राशी येत नाही, तसेच भुश्शाच्या थरामुळे खुरांची साफसफाई आपोआपच होऊन जाते.
4) गोठ्याच्या स्वच्छतेबरोबरच खुरांचे आणि गोठ्याचे निर्जंतुकीकरण नियमित केल्यास खुरांचे आजार कमी होतात. जसे आपण कासेचा दाह टाळण्यासाठी टीट डिपिंग करतो, त्याचप्रमाणे फूट बाथिंग करणे खुरांचे आजार टाळण्यास अत्यंत फायदेशीर ठरते. यासाठी शुद्ध पाणी किंवा साबणाचे पाणी, तसेच जंतुनाशकाच्या पाण्याची फवारणी गोठ्यात करावी.
- 5) खुरांच्या आरोग्यामध्ये वेळच्या वेळी खुरे कापून घेणे हा महत्त्वाचा भाग आहे. खुरांच्या झालेल्या कमी- जास्त वाढीमुळे जनावरास सर्व पायांवर संतुलित भार पेलणे कठीण जाते, त्यामुळे खुरांच्या आजारास जनावर लवकर बळी पडते.
6) एखादी गाय, जनावर लंगडत असल्यास त्याच्याकडे दुर्लक्ष न करता पशुवैद्यकाच्या निदर्शनास आणून द्यावे. त्यांच्या सल्ल्यानेच उपचार करावेत.
लेखक :-
डॉ .गणेश उत्तमराव काळुसे.
विषय विशेषज्ञ (पशुसंवर्धन व दुग्धव्यवसाय)
मोबाईल-८८३०६४८७३७
कृषि विज्ञान केंद्र , बुलढाणा
Share your comments