भारत हा कृषीप्रधान देश असून बहुसंख्य लोकसंख्या ही शेती क्षेत्रावर अवलंबून आहे. भारताची अर्थव्यवस्था कृषी क्षेत्रावर अवलंबून आहे. भारतातल्या बहुतांशी ग्रामीण भागांमध्ये शेती मोठ्या प्रमाणात केली जाते व शेती करत असताना
बरेचसे शेतकरी हे शेतीला जोडधंदा म्हणून पशूपालन, कुक्कुटपालन, शेळीपालन यासारखे व्यवसाय मोठ्या प्रमाणात करतात.
या जोडधंदयापैकी शेळी पालन हा व्यवसाय करायला सोपा आणि कमी खर्चिक म्हणून गणला जातो. आपल्याला माहित आहेच की शेळीला ''गरीबाची गाय'' म्हणतात. कारण शेळी हा काटक प्राणी असून झाडाझुडपांवर उदरनिर्वाह शेळी करू शकते.
त्यामुळे पालनपोषणाचा खर्च देखील कमी येतो आणि दुसरी गोष्ट म्हणजे जागा कमी लागत असल्यामुळे फार मोठ्या प्रमाणात शेळीपालनात जागेची आवश्यकता भासत नाही.
शेळीपालनामध्ये आपल्याला माहित आहेच कि शेळ्यांच्या विविध प्रकारच्या जाती भारतात आहेत. यामध्ये आपल्याला सिरोही, जमुना परी, उस्मानाबादी, बोअर इत्यादी जाती प्रसिद्ध आहेत.
परंतु काही विदेशी शेळीच्या जाती देखील शेळीपालनासाठी तितक्याच महत्त्वाच्या आहेत. या लेखामध्ये आपण अशाच एका विदेशी शेळीच्या जातीची माहिती घेणार आहोत.
नक्की वाचा:जमुनापरी शेळी' देईल शेळीपालनात बंपर नफा, घ्या 'या' गोष्टींची काळजी
'अल्पाइन' आहे एक विदेशी शेळी
अल्पाइन ही एक विदेशी शेळी असून या जातीच्या शेळ्या स्वित्झर्लंड तसेच फ्रान्समध्ये या देशात मूळ आहे. या शेळीपालनात उपयुक्त असून दूध देण्याची क्षमता यांची खूप आहे.
असे ज्या शेळ्यांचे दूध पौष्टीक दृष्ट्या देखील उच्च दर्जाचे असून त्यांच्या दुधातील स्निग्धांशाचे प्रमाण तीन ते चार टक्क्यांपर्यंत असते.
अल्पाइन शेळीचे सगळ्यात महत्त्वाचे वैशिष्ट्य म्हणजे ही शेळी दिवसाकाठी पाच लिटरपर्यंत दूध देते. तसेच विविध रंगांमध्ये ही शेळी आढळत असून काळा, पांढरा, करडा किंवा एकत्रित मिक्स रंगांमध्ये आढळते.
अल्पाइन जातीची शेळी शिंगे असलेली असून या जातीच्या बोकडाचा वजनाचा विचार केला तर 65 ते 80 किलो वजन असते तर मादी शेळीचे वजन हे 50 ते 60 किलो असते.
नक्की वाचा:बोअर शेळी पाळा अन शेळीपालनात मिळवा भक्कम आर्थिक स्थैर्य, जाणून घ्या बोअर शेळीचे वैशिष्ट्य
Share your comments