दुधाचे उत्पादन वाढवायचे असेल तर जनावरांच्या चाऱ्यामध्ये हिरवा चारा, पेंड तसेच कळणा या पशु खांद्याचा समावेश करणे गरजेचे आहे जे की यामुळे जनावरांच्या दूध उत्पादनात वाढ होईल. शास्त्रीय संगीत ऐकल्याने दुभत्या जनावराच्या दुधाच्या उत्पादनात वाढ झाली असे तुम्ही कधी ऐकले नसेल पण हा प्रयोग एका तुर्की शेतकऱ्याने केलेला आहे. हे जरी काही वेगळे असले तरी सुद्धा या अनोख्या पद्धतीचा शेतकऱ्यांना फायदा झालेला आहे असे त्यांनी सांगितले आहे. आता पर्यंत गाईच्या दुधाच्या उत्पादनात वाढ व्हावी यासाठी शेतकरी हिरवा चाऱ्याचा समावेश त्यांच्या खाद्यामध्ये करायचे मात्र या तुर्की शेतकऱ्याने चक्क गाईच्या कानाला हेडफोन लावून त्यांना शास्त्रीय संगीत ऐकवले आहे. इज्जत कोकॅक असे या तुर्की शेतकऱ्याचे नाव आहे.
100 गायींची जोपासाना, दिवसाला हजारो लिटर दूध :-
इज्जत कोकॅक या शेतकऱ्याने १०० गायी जोपासल्या आहेत जे की एक गायी दिवसाला जवळपास २२ लिटर दुध देते. अशा प्रकारे १०० गायी महिन्याला जवळपास २२०० लिटर दुध देत आहेत. इज्जत कोकॅक या शेतकऱ्याने एक शक्कल लढवली आणि त्याने खाद्यपदार्थमध्ये तर हिरवा चाऱ्याचा समावेश करत होताच पण त्याचसोबत इज्जत ने गाईच्या कानाला हेडफोन लावले आणि त्यांना शास्त्रीय संगीत ऐकवायला सुरू केले तेव्हापासून गाईच्या दुधामध्ये वाढ झालेली आहे जे की ही वाढ थोड्या प्रमाणात नाही तर चक्क ५ लिटर दुधात वाढ झाली आहे. आताच्या स्थितीला एक गाई दिवसाला २७ लिटर दुध देत असल्याचा दावा इज्जत ने केला आहे.
काय आहे तरुणाचा दावा?
जनावरांच्या भावनिक दृष्टीने शास्त्रीय संगीत हे महत्वाचे मानले जाते जे की जनावरांना शास्त्रीय संगीत ऐकवले की त्यांचे मन प्रसन्न होते तसेच त्यांच्या दुधामध्ये सुद्धा वाढ होत आहे. फक्त दुधामध्येच वाढ झाली आहे असे नाही यर त्या दुधाचा दर्जा सुद्धा वाढला आहे असा ही दावा इज्जत ने केला आहे. इज्जत सांगतो की माझ्या गाई शास्त्रीय संगीत ऐकतात जे की या संगीतामुळे त्यांचे मन शांत तसेच प्रसन्न होते. आणि याच कारणांमुळे त्याच्या दुधाच्या उत्पादनात वाढ ही झालेली आहे आणि दर्जा ही सुधारला आहे जे की लोकांना यावर विश्वास बसणार नाही पण हे सत्य आहे.
दावणीत चारा आणि गायींना हेडफोन :-
इज्जत कोकॅक या तुर्की शेतकऱ्याने १०० गायी दूध व्यवसायासाठी विकत घेतल्या होत्या जे की एक गाई प्रति दिवसाला सुमारे २२ लिटर दुध द्यायची. इज्जत गाई ना वेळोवेळी चारा सुद्धा देत असायचे जे की त्यांची जोपासना सुद्धा चांगल्या प्रकारे करायचे. यासोबतच त्यांनी शास्त्रीय संगीत ऐकवायला सुरू केले जे की यामुळे ५ लिटर दुधात सुद्धा वाढ झाली आहे.
Share your comments