आपल्या देशात अनेक हौशी पशुपालक शेतकरी (Livestock Farmers) महागड्या पशुचे संगोपन करत असतात. यांच्या किमती चक्क कोट्यवधींच्या घरात असतात. नुकत्याच काही दिवसांपूर्वी सांगली (Sangli) मधील तासगाव तालुक्यात एका कृषी प्रदर्शनाचे (Agricultural Exhibition) आयोजन करण्यात आले होते यामध्ये गजेंद्र रेड्याची मोठी चर्चा रंगली होती. याला पाहण्यासाठी त्यावेळी अनेक पशुपालकांनी मोठी गर्दी केली होती.
तासगाव मध्ये आयोजित कृषी प्रदर्शनात दीड टन वजनाचा गजेंद्र रेडा प्रमुख आकर्षण होता. आता हाच गजेंद्र अहमदनगर (Ahmednagar) मध्ये मार्केट गाजवत आहे. राहुरी येथे आयोजित कृषी प्रदर्शनात गजेंद्र रेड्याची (Gajendra Buffalo) हजेरी लागल्याने पशुपालक शेतकऱ्यांची या रेड्याला बघण्यासाठी एकच झुंबड उडाली आहे.
कर्नाटक (Karnatka) मधील मुंगसुळी या गावातील विलास नाईक या पशुपालक शेतकरी हा या गजेंद्र रेड्याचा मालक आहे. गजेंद्र विशेष म्हणजे त्याच्या वजनासाठी विख्यात आहे. त्याचे सुमारे दीड टन वजन असल्याने गजेंद्र जिथे जातो तिथे त्याचा तोरा कायमच असतो.
नुकत्याच चार महिन्यांपूर्वी एका अवलिया शेतकऱ्याने या रेड्याला तब्बल 80 लाखांची बोली लावली होती. मात्र या रेड्याच्या मालकाने त्याला विकण्यास मनाई दाखवली. आता पुन्हा एकदा गजेंद्र रेड्याला बोली लावण्यात आली असून जवळपास वीस लाख रुपये चढवून बोली लावण्यात आली आहे. सध्या गजेंद्र रेड्याला एक कोटीला खरेदी करण्याची तयारी दाखवली आहे. परंतु गजेंद्र घरच्या म्हशी ची पैदास असल्यामुळे त्याच्या मालकाने त्याला विकण्यास स्पष्ट नकार दिला आहे.
गजेंद्र हा मुरा जातीचा रेडा आहे. देशातील अनेक कृषी प्रदर्शनात गजेंद्र रेड्याने हजेरी लावली आहे आणि प्रत्येक कृषी प्रदर्शनात गजेंद्र हा प्रमुख आकर्षणाचा केंद्र ठरत असतो.
राहुरी मध्ये देखील गजेंद्र एक आकर्षणाचा केंद्र ठरला आहे. याला पाहण्यासाठी पशुपालक शेतकऱ्यांनी मोठी गर्दी केली होती. दीड टन वजनी आणि एक कोटी रुपयांचा गजेंद्र रेडा आपल्या वजनामुळे आणि किंमतीमुळे मोठा विख्यात आहे. गजेंद्र याचे वजन ज्याप्रकारे सर्वांना त्याच्याकडे पाहण्यास भाग पाडते अगदी त्याच प्रकारे त्याचा खुराक देखील पाहण्यासारखाच आहे. गजेंद्र एका दिवसात 15 किलो दूध, तीन किलो भरडा, तीन किलो आटा, पाच किलो सफरचंद, याशिवाय ऊस खात असतो. हा गजेंद्र रेडा अवघ्या चार वर्षे आणि पाच महिने वयाचा आहे.
Share your comments